'जोवर हिंदुत्ववादी सरकार आहे तोवर सर्वधर्मीय सुखात..'; शरद पोंक्षेंचं मतदान केल्यावर मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 02:59 PM2024-05-20T14:59:51+5:302024-05-20T16:15:35+5:30
शरद पोक्षेंनी मतदान केल्यावर त्यांच्या भावना मीडियाशी बोलताना शेअर करुन पुन्हा एकदा मोदी सरकार निवडून यावं असं सांगितलं आहे (sharad ponkshe)
आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडतोय. या टप्प्यात मुंबईसह ठाणे कल्याण - डोंबीवली आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मतदान पार पडतंय. सामान्य नागरीकांपासून मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील विविध कलाकार आज मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. अशातच मतदान केल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे आणि त्यांचा लेक स्नेह पोंक्षेने त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
शरद पोंक्षे यावेळी मतदान केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे. शरद पोंक्षे म्हणाले, "पुन्हा भाजपा आणि मोदीच निवडून यावेत अशी माझी इच्छा आहे. जोवर हिंदुत्ववादी सरकार आहे तोवर इतर धर्मीयांना कोणताही त्रास होणार नाही." असं मत शरद पोंक्षेंनी व्यक्त केलं. याशिवाय त्यांचा मुलगा स्नेहने सुद्धा मोदीच पुन्हा निवडून यावेत अशी इच्छा व्यक्त केली. अशाप्रकारे पोंक्षे बाप-लेकांनी त्यांचं मत व्यक्त केलंय.
शरद पोंक्षें हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. शरद पोंक्षें यांना आपण विविध नाटक, सिनेमा, मालिका, वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय. शरद पोंक्षे यांचा अभिनय असलेला कुंकू, वादळवाट या मालिका प्रचंड गाजल्या. शरद पोंक्षेंची भूमिका असलेलं मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटकही रंगभूमीवर गाजलं. शरद पोंक्षे महाराष्ट्रातील विविध भागांत हिंदुत्वाचा प्रचार करताना दिसतात.