IIFA Awards 2018: श्रीदेवी आणि इरफान खान ठरले ‘बेस्ट अॅक्टर’ तर ‘तुम्हारी सुलू’ ‘बेस्ट फिल्म’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 09:49 AM2018-06-25T09:49:16+5:302018-06-25T09:49:56+5:30
ग्लॅमर, एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स आणि आयफाची बाहुलीवर कुणाचे नाव कोरले जाते, याची क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा अशा वातावाणात काल रविवारी आयफा अवार्ड्स2018 च्या रंगारंग सोहळयाची मुख्य रात्र रंगली.
बॅंकॉक : ग्लॅमर, एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स आणि आयफाची बाहुलीवर कुणाचे नाव कोरले जाते, याची क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा अशा वातावाणात काल रविवारी आयफा अवार्ड्स2018 च्या रंगारंग सोहळयाची मुख्य रात्र रंगली. रात्री उशीरा या सोहळ्यांच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
सोहळा सुरू झाला आणि आयफाच्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा दिसला. श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अनिल कपूर, अर्जुन कपूर, वरूण धवन, कार्तिक आर्यन असे सगळे ग्रीन कार्पेटवर दिसले. यानंतर करण जोहर आणि रितेश देशमुख यांच्या जुगलबंदीने स्टेजचा ताबा घेतला आणि आयफाची मुख्य रात्र उत्तरोत्तर रंगत गेली.
सदाबहार अभिनेत्री रेखा या सोहळ्यात तब्बल २० वर्षांनंतर परफॉर्म करणार होत्या. त्याची पे्रक्षकांसोबत सगळ्यांनाच प्रतीक्षा होती. अखेर तो क्षण आला. आयफाच्या मंचावर उतरलेल्या या अप्सरेने सगळ्यांचीच मने जिंकली. पाठोपाठ वरूण धवन, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा, क्रिती सॅनन, मौनी राय यांचे दमदार परफॉर्मन्स झालेत. या परफॉर्मन्सनंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती सेलिब्रिटींना विनिंग ट्रॉफीसोबत पाहण्याची. तोही क्षण आला. अभिनेत्री विद्या बालन आणि मानव कौल यांच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्विकारला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर अभिनेता इरफान खान याने आपले नाव कोरले़ ‘हिंदी मीडियम’साठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. ‘सीक्रेट सुपरस्टार’साठी मेहर हिज याला बेस्ट सर्पोटींग अॅक्टर फीमेल आणि नवाजुद्दीन सिद्दीकीला बेस्ट सर्पोटींग एक्टर मेलचा पुरस्कार मिळाला.
आयफा पुरस्कार विजेत्यांची यादी...
बेस्ट स्टोरी : अमित मसूरकर, न्यूटन
बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल): अरिजीत सिंह, हवाएं (जब हैरी मेट सेजल)
बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल): मेघना मिश्रा, मैं कौन हूं (सीक्रेट सुपरस्टार)
बेस्ट बॅकग्राउंड स्कोर: प्रीतम चक्रवर्ती, जग्गा जासूस
सर्वश्रेष्ठ गीत: नुसरत फतेह अली खान, ए 1 मेलोडी फना आणि मनोज मुंतशीर, मेरे रश्के कमर (बादशाहो)
बेस्ट कोरियोग्राफी: विजय गांगुली आणि रुएल डोसन वारिन्दानी, जग्गा जासूस
बेस्ट स्पेशल इफेक्ट्स: एनआई वीएफएक्स , जग्गा जासूस
बेस्ट स्क्रीनप्ले: नितेश तिवारी आणि श्रेयश जेनस, बरेली की बर्फी
बेस्ट डॉयलॉग: हितेश केवल्य, शुभ मंगल सावधान
बेस्ट एडिटिंग: व्यंकट मैथ्यू, न्यूटन
बेस्ट साउंड डिजाइन: दिलीप सुब्रमण्यम आणि गणेश गंगाधरन, टाइगर जिंदा है