मैं हूँ खिलाडी

By Admin | Published: January 13, 2017 05:28 AM2017-01-13T05:28:22+5:302017-01-13T05:28:22+5:30

अक्षयकुमार हा खऱ्या आयुष्यातही खिलाडी असल्याचे त्याने अनेक वेळा सिद्ध केले आहे. बॉलिवूडमधील सगळेच

I'm player | मैं हूँ खिलाडी

मैं हूँ खिलाडी

googlenewsNext

अक्षयकुमार हा खऱ्या आयुष्यातही खिलाडी असल्याचे त्याने अनेक वेळा सिद्ध केले आहे. बॉलिवूडमधील सगळेच दिग्गज कलाकार वर्षाला केवळ एक-दोन चित्रपट करीत असले तरी हा खिलाडी वर्षाला तीन-चार चित्रपट करतो आणि त्याचे सगळेच चित्रपट हे सुपरहिट होतात. अक्षय वर्षाला इतके चित्रपट कसा करू शकतो, याचे गुपित नुकतेच त्याने शेअर केले आहे...
अक्षयकुमार प्रत्येक वर्षाला कमीत कमी तीन-चार चित्रपटांमध्ये काम करतो. त्याने २०१७ च्या सुरुवातीलाच चार चित्रपटांची घोषणा केली आहे. या वर्षात अक्षयचे जॉनी एलएलबी २, टॉयलेट - एक प्रेमकथा, टू पॉर्इंट झिरो आणि पॅडमॅन असे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चारही चित्रपटांमधील त्याच्या भूमिका या खूपच वेगवेगळ्या आहेत.
अक्षय वर्षभरात चार चित्रपट कशा प्रकारे करू शकतो, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. बॉलिवूडमधील सगळे दिग्गज कलाकार वर्षातून एक-दोनच चित्रपट करतात. पण अक्षय या सगळ्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. वर्षभर कशा प्रकारे काम करायचे, याचे टाइमटेबल तो वर्षाच्या सुरुवातीलाच आखतो. या वर्षाचे टाइमटेबलदेखील त्याने तयार केले आहे. त्यानेच हे गुपित मीडियासमोर उघड केले आहे.
अक्षय हा अतिशय शिस्तप्रिय आहे. तो कधीही रात्रीच्या पार्टींना जात नाही. तसेच तो रोज भल्या पहाटे उठतो. त्याने त्याच्या वेळापत्रकाबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे. अक्षय वर्षातून चार चित्रपट करीत असल्याने वर्षातील ६० दिवस प्रत्येक चित्रपटाला देणार आहे. त्यानुसार तो वर्षातील २४० दिवस चित्रपटांच्या चित्रीकरणाला देणार आहे. इतके दिवस चित्रीकरण करूनही त्याच्याकडे १२५ दिवस शिल्लक राहणार आहेत. अक्षय हा संपूर्ण फॅमिली मॅन असल्याने तो जास्तीत जास्त वेळ त्याच्या पत्नीला म्हणजेच ट्विंकल खन्ना आणि त्याच्या मुलांना देतो. त्यामुळे मुलांच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी तो कोणतेही काम करीत नाही. तो संपूर्ण दिवस त्यांच्यासोबतच घालवतो. त्यामुळे दर रविवारी यानुसार वर्षातील ५२ दिवस तो चित्रीकरण करीत नाही. तो प्रत्येक चित्रपटाचे चित्रीकरण केल्यानंतर एका आठवड्याचा ब्रेक घेतो. म्हणजे तीन चित्रपटांनंतर तो २१ दिवसांची सुट्टी घेतो. तसेच वर्षातील एकूण ४५ दिवस तो मुलांसोबत आणि ट्विंकलसोबत हॉलिडेवर जातो. याचा अर्थ तो वर्षातील ११८ दिवस काम करीत नाही. यानुसार अक्षय २४० दिवस काम करतो, तर ११८ दिवस सुट्टी घेतो. दोन्ही मिळून ३५८ दिवस होतात. उरलेले सात दिवस तो जाहिरातींना देतो.
अक्षय त्याने त्याचे आखलेले वेळापत्रक अगदी व्यवस्थितरीत्या पाळतो. घड्याळाच्या काट्याप्रमाणे तो चालत असतो. त्याची सकाळ पहाटे चार वाजता सुरू होते, तर रात्री तो लवकर झोपतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग केला पाहिजे, असे त्याचे म्हणणे आहे. या सगळ्यांमुळेच त्याला इतके चित्रपट करणे शक्य होत आहे.

Web Title: I'm player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.