काय सांगता! 'मिर्झापूर ३' मध्ये 'पंचायत'मधल्या 'सचिवजीं'ची एन्ट्री? साकारणार ही खास भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 12:27 PM2024-07-01T12:27:37+5:302024-07-01T12:28:01+5:30

पंकज त्रिपाठींच्या बहुचर्चित 'मिर्झापूर ३'मध्ये 'सचिव'जी दिसणार आहेत. कारणही तसंच खास आहे (mirzapur 3)

In Mirzapur 3 panchayat 3 star jitendra kumar will be seen ali fazal statement viral | काय सांगता! 'मिर्झापूर ३' मध्ये 'पंचायत'मधल्या 'सचिवजीं'ची एन्ट्री? साकारणार ही खास भूमिका

काय सांगता! 'मिर्झापूर ३' मध्ये 'पंचायत'मधल्या 'सचिवजीं'ची एन्ट्री? साकारणार ही खास भूमिका

गेल्या अनेक वर्षातील बहुचर्चित सीरिज म्हणजे 'मिर्झापूर ३'. पंकज त्रिपाठींची प्रमुख भूमिका असलेली 'मिर्झापूर ३' वेबसीरिज काहीच दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी सीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यावर सर्वांची उत्सुकता आणखी चाळवली गेली. आता 'मिर्झापूर ३'बद्दल एक महत्वाची अपडेट समोर येतेय. ती म्हणजे 'मिर्झापूर ३' मध्ये 'पंचायत' सीरिजमधील सचिवजी अर्थात अभिनेता जितेंद्र कुमार एका खास भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. सविस्तर जाणून घ्या.

'मिर्झापूर ३'मध्ये दिसणार सचिवजी?

'मिर्झापूर ३' मध्ये पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. नुकत्याच ABP ने दिलेल्या अहवालानुसार 'मिर्झापूर ३'मध्ये सचिवजी अर्थात अभिनेता जितेंद्र कुमार झळकणार आहे. विशेष म्हणजे जितेंद्र कुमार 'पंचायत'मधील सचिवजींच्याच भूमिकेत 'मिर्झापूर ३'मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी 'मिर्झापूर'मधील गुड्डू पंडित म्हणजेच अली फजलने याविषयी अपडेट दिली होती.

अली फजलने ANI ला सांगितलं की, "मिर्झापूरमध्ये जितेंद्रची एंट्री क्रॉस-प्रमोशनचा भाग असेल." सचिवजी अर्थात जितेंद्र कुमार काही कागदपत्रांसाठी मिर्झापूरला येणार. कारण त्याला कालिन भैय्या (पंकज त्रिपाठी) च्या मृत्यूबद्दल पुरावे लागणार आहेत. जितेंद्र कुमार 'मिर्झापूर ३' मध्ये दोन भागांसाठी झळकणार असल्याची शक्यता आहे.

'मिर्झापूर ३' कधी होणार रिलीज

'मिर्झापूर 3' ची उत्कंठा शिगेला आहे. पुन्हा एकदा सीरिजमध्ये दिग्गज कलाकारांची फौज दिसतेय. पंकज त्रिपाठीअली फजल, श्वेता त्रिपाठी,  रसिका डुगल, विजय वर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी 'मिर्झापूर 3' ची निर्मिती केलीय. प्राईम व्हिडीओवर ५ जुलै २०२४ ला 'मिर्झापूर 3' रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे बहुचर्चित 'पंचायत' वेबसीरिजचा तिसरा सीझनही चांगलाच गाजला.

 

 

Web Title: In Mirzapur 3 panchayat 3 star jitendra kumar will be seen ali fazal statement viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.