'मुन्नाभाई MBBS'मध्ये संजय दत्त मुन्नाचं नाही तर साकारणार होता ही भूमिका, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:12 PM2024-11-25T17:12:05+5:302024-11-25T17:12:38+5:30

Munnabhai MBBS Movie : २००३ साली रिलीज झालेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटात संजय दत्त मुन्ना भाईची भूमिका साकारणार नव्हता.

In 'Munnabhai MBBS', Sanjay Dutt was to play the role of Munna, but... | 'मुन्नाभाई MBBS'मध्ये संजय दत्त मुन्नाचं नाही तर साकारणार होता ही भूमिका, पण...

'मुन्नाभाई MBBS'मध्ये संजय दत्त मुन्नाचं नाही तर साकारणार होता ही भूमिका, पण...

२००३ साली प्रदर्शित झालेला मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS Movie) हा चित्रपट संजय दत्त(Sanjay Dutt)च्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामध्ये त्याने मुन्ना भाई आणि अर्शद वारसीने सर्किटच्या भूमिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य केले. पण तुम्हाला माहित आहे का की मुन्ना भाईच्या आधी संजय दत्त या चित्रपटात दुसरी भूमिका साकारणार होता. मुन्नाभाई एमबीबीएसचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी गोव्यात सुरू असलेल्या ५५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) याचा उल्लेख केला.

मुन्नाभाई एमबीबीएसच्या निर्मितीबद्दल बोलत असताना, विधू विनोद चोप्रा यांनी खुलासा केला की, संजय दत्त पहिल्यांदा जिमी शेरगिलच्या झहीरची भूमिका साकारणार होता. तर मुख्य भूमिकेसाठी दुसऱ्या स्टारची निवड करण्यात आली होती. पण शेवटच्या क्षणी त्याने माघार घेतली, त्यामुळे संजय दत्तची निवड झाली.

..तर मुन्नाभाईच्या भूमिकेत दिसला असता हा अभिनेता

विधू विनोद चोप्रा म्हणाले की, मुन्नाभाईची भूमिका अन्य कोणीतरी स्टार करणार होता. मी त्याचे नाव घेणार नाही. माझी बायको मला मारेल. प्रत्येक स्टारप्रमाणेच त्याने शेवटच्या क्षणी कोणत्या तरी कारणास्तव माघार घेतली. संजय दत्त जिमी शेरगिलची भूमिका साकारणार होता. तो मुन्नाभाई नव्हता. दरम्यान अलीकडेच बातम्या आल्या होत्या की शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार होता आणि मकरंद देशपांडे सर्किटची भूमिका साकारणार होता.

संजय दत्तने वाचली नाही स्क्रीप्ट

निर्मात्यांनी सांगितले की, संजय दत्तने मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगूनही त्याने चित्रपटाची स्क्रिप्टही वाचली नव्हती. ते म्हणाले, संजय आल्यावर मी म्हणालो, तू मुन्ना भाई करत आहेस. मुख्य पात्र, तो असा होता, तुम्ही जे सांगाल ते मी करीन. तो कोणत्याही पात्रात विशेष नव्हता. आपण कितीही प्रयत्न केले तरी तो स्क्रिप्ट वाचतही नाही. मी संजूला स्क्रिप्ट वाचायला दिली, तो दीड तासानंतर आला आणि म्हणाला, अप्रतिम स्क्रिप्ट आहे. त्याने एक पानही वाचले नाही. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी खुलासा केला होता की ते मुन्ना भाई एमबीबीएस ३ आणण्याचा विचार करत आहेत.

Web Title: In 'Munnabhai MBBS', Sanjay Dutt was to play the role of Munna, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.