'पहला नशा'मध्ये पूजा बेदीचा स्कर्ट उडाला अन् ते पाहून स्पॉट बॉय...; फराह खानने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 04:37 PM2024-06-12T16:37:46+5:302024-06-12T16:39:43+5:30
Farah Khan : जो जीता वही सिकंदर हा आमिर खानच्या कारकिर्दीतील सर्वाधिक पसंतीचा सिनेमा आहे. या चित्रपटातील 'पहला नशा' हे रोमँटिक गाणेही खूप गाजले. फराह खानने अलीकडेच शूटिंगशी संबंधित एक मजेशीर प्रसंग सांगितला.
'जो जीता वही सिकंदर' हा ९०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. आजही लोकांना या चित्रपटाची कथा आवडते. जो जीता वही सिकंदर हा आमिर खान(Aamir Khan)च्या कारकिर्दीतील सर्वाधिक पसंतीचा सिनेमा आहे. या चित्रपटातील 'पहला नशा' हे रोमँटिक गाणेही खूप गाजले. फराह खान(Farah Khan)ने अलीकडेच शूटिंगशी संबंधित एक मजेशीर प्रसंग सांगितला.
आमिर खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेला 'जो जीता वही सिकंदर' लोकांना आजही पाहायला आवडतो. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला ३१ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आजही लोकांना हा चित्रपट पाहायला आवडतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फराह खानने चित्रपटाशी संबंधित एक मजेदार प्रसंग सांगितला.
फराह खानने 'जो जीता वही सिकंदर'चा सांगितला किस्सा
रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत फराह खानने सांगितले की तिला 'पहला नशा' गाणे कोरिओग्राफ करण्याची संधी कशी मिळाली. तिने सांगितले की, हे गाणे सुरुवातीला दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांना करायचे होते. पण योगायोगाने नंतर तिला हे गाणे कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली.
फराहला अशी मिळाली 'पहली नशा' कोरिओग्राफ करण्याची संधी
फराहने सांगितले की, सरोज खान 'पहला नशा'चे शूटिंग करणार होत्या. मग काहीतरी घडले आणि त्यांना श्रीदेवी किंवा माधुरीसोबत शूट करण्यासाठी मुंबईला (तेव्हाचे बॉम्बे) परत जावे लागले आणि आम्ही उटीला होतो. त्या निघून गेल्या आणि परत आल्या नाहीत. फराहने सांगितले की, तोपर्यंत ती काही शोची कोरिओग्राफी करत होती. त्यांना दिग्दर्शक मन्सूर खान यांनी बोलावून त्या गाण्याचे काम सांभाळण्यास सांगितले. शूटिंग थांबले असते तर त्यांचे पैसे बुडाले असते.
'पूजा बेदीचा स्कर्ट उडाला'
पहला नशा गाणे हे आमिर खान, आयेशा झुल्का आणि पूजा बेदी यांच्यावर चित्रित केलेले होते. या गाण्याच्या एका सीनमध्ये पूजाला मर्लिन मनरो स्टाइलमध्ये पोज द्यायची होती. फराहने हे गाणे कोरिओग्राफ केले होते. आपल्या क्रिएटिव्हिटीने त्यांनी गाण्यात स्लो मोशन जोडून ते स्वप्नासारखे केले.
अन् स्पॉट बॉय पडला बेशुद्ध
फराहने सांगितले की, गाण्याच्या एका सीनमध्ये पूजा बेदीला कारवर उभे राहावे लागले आणि काही कर्मचाऱ्यांना पंख्याच्या मदतीने तिचा स्कर्ट खालून उडवावा लागला. पुढे काय झाले ते आठवून फराहला हसू आवरता आले नाही. फराह हसत हसत म्हणाली, 'पूजा बेदीला मर्लिन मनरो स्टाईलमध्ये शूट करण्याची माझी कल्पना होती. मी पूजाला सांगितले की जेव्हा पंखा चालू होईल तेव्हा तू तुझा स्कर्ट खाली कर. पहिल्या शॉटमध्ये एका स्पॉट बॉयने पंखा धरला होता. फॅन सुरू झाल्यावर पूजाने तिचा स्कर्ट खाली केला नाही. हे सर्व पाहून स्पॉट बॉय बेशुद्ध पडला. तेव्हा मी पहिल्यांदा पाहिले होते की थाँग कसे दिसते.
अशी होती पूजा बेदीची प्रतिक्रिया
फराह खानने सांगितले की, पूजा बेदी मस्त होती. जणू काय घडले याची तिला पर्वाच नव्हती.