काजोलने साजरा केला ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर स्वातंत्र्यदिन साजरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 02:01 PM2018-08-07T14:01:31+5:302018-08-07T14:24:48+5:30

कार्यक्रमाचा प्रारंभ ‘ऑस्कर’विजेत्या ‘जय हो’ चित्रपटाच्या शीर्षकगीताने केली आणि त्यापाठोपाठ ‘चक दे इंडिया!’ चित्रपटातील गीत गायले. काजोल आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

Independence Day celebrations on Dil Hai Hindustani 2 with Kajol | काजोलने साजरा केला ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर स्वातंत्र्यदिन साजरा!

काजोलने साजरा केला ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर स्वातंत्र्यदिन साजरा!

googlenewsNext
ठळक मुद्दे जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आहे

स्वातंत्र्यदिन नजीक येऊन ठेपला असल्याने संगिताच्या माध्यमातून देशभक्ती आणि शांततेचा संदेश देण्याचे काम ‘दिल है हिंदुस्तानी-2’ या कार्यक्रमात सुरू आहे. या विशेष भागात नामवंत पार्श्वगायक सुखविंदरसिंग आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोल हे प्रीतम, बादशहा आणि सुनिधी चौहान या परीक्षकांबरोबर एकत्र आल्याने प्रेक्षकांसाठी ही दुहेरी पर्वणी होती. पायाने ठेका धरायला लावणाऱ्या आपल्या राष्ट्रभक्तीपर गीतांसाठी सुखविंदरसिंग जगभरात प्रसिध्द असल्याने या स्वातंत्र्यदिनाच्या विशेष भागासाठी त्याची उपस्थिती अगदी समयोचित झाली. त्यानेही आपल्या आवाजात गाणी गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्याने आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभ ‘ऑस्कर’विजेत्या ‘जय हो’ चित्रपटाच्या शीर्षकगीताने केली आणि त्यापाठोपाठ ‘चक दे इंडिया!’ चित्रपटातील गीत गायले. काजोल आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या कार्यक्रमात सहभागी झाली होती. भारतीय आणि परदेशी स्पर्धकांनी भारतीय संगीतावरील आपले प्रेम व्यक्त करताना गायलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे स्वातंत्र्यदिनाच्या भावनेला विशेषच बळकटी मिळाली. सुखविंदरसिंगचे या कार्यक्रमात स्वागत करण्यासाठी स्पर्धकांनी त्याची काही लोकप्रिय गीते गाऊन त्याला आदरांजली वाहिली. भारतीय टीव्हीवरील कोणत्याही रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात प्रथमच स्पर्धकांना एखाद्या दिग्गज गायकाबरोबर गीते गाण्याची संधी मिळत आहे.

या विशेष भागावर भाष्य करतना सुखविंदरसिंग म्हणाला, “‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या स्वातंत्र्यदिनाच्या विशेष भागात नामवंत अभिनेत्री काजोल हिच्याबरोबर मला सहभागी होता आलं, यामुळे मी खरोखरच त्यांचा आभारी आहे. या कार्यक्रमात भारतीय संगीताचा मोठा सन्मान केला जातो आणि भारतीय संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील सर्वांना एकत्र आणलं जातं हा स्वातंत्र्यदिनानिमित्त दिला जाणारा अगदी उचित संदेश आहे. हे सर्वच स्पर्धक विलक्षण गुणी असून त्यातील काहीजणांबरोबर मी एकत्र गाणंही गायलं आहे. जगाच्या विविध भागांतील लोकांना भारतीय संगीत इतक्या अचूकपणे गाताना आणि त्यांना भारतीयत्वाशी समरस झालेलं पाहून मला फार नवल वाटलं.”

‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सीमा पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.

Web Title: Independence Day celebrations on Dil Hai Hindustani 2 with Kajol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kajolकाजोल