भारतीय चित्रपटांचे ‘मिशन पाकिस्तान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2015 03:14 AM2015-08-30T03:14:50+5:302015-08-30T03:14:50+5:30
पाकिस्तानमध्ये जाऊन मुंबई स्फोटातील दोन मोठ्या अतिरेक्यांचा खात्मा करून न्याय मिळवून देणाऱ्या फँटम चित्रपटाच्या नायकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक भारतीयाला
पाकिस्तानमध्ये जाऊन मुंबई स्फोटातील दोन मोठ्या अतिरेक्यांचा खात्मा करून न्याय मिळवून देणाऱ्या फँटम चित्रपटाच्या नायकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक भारतीयाला चित्रपटात अशा कल्पना आवडत असतात. यापूर्वीही अशा कल्पनेवर चित्रपट निघाले आहेत.
‘दीवार-लेट्स ब्रिंग अवर हीरोज बॅक’
काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक मिलन लथुरियाने एक चित्रपट तयार केला होता. ‘दीवार-लेट्स ब्रिंग अवर हीरोज बॅक’. पाकिस्तानी जेलमध्ये बंद असणाऱ्या भारतीय सैनिकांवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात मुलगा (अक्षय खन्ना) आपले वडील (अमिताभ बच्चन) यांना परत आणण्यासाठी पाकिस्तानमध्ये जातो.
जमीन : रोहित शेट्टीच्या ‘जमीन’ या चित्रपटात अजय देवगण सैन्याची तुकडी घेऊन दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेले भारतीय विमान सोडविण्यासाठी पाकिस्तानात जातो.
गदर : अनिल शर्माचा सुपरहिट चित्रपट ‘गदर’मध्ये सनी देओल आपल्या मुलाला त्याच्या आईची भेट घडविण्यासाठी पाकिस्तानात जातो आणि मुलगा, पत्नीसह परत येतो. या सर्व चित्रपटांत एकच समान गोष्ट आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीय शत्रूंना आणि अतिरेक्यांना सरळ आव्हान दिले जाते. त्यांचा खात्मा करण्यासाठी सीमापार जाण्यासही ते कचरत नाहीत. अमेरिकेद्वारे पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर भारतात या गोष्टीला अधिक चर्चिले जाते. याचा आधार घेत चित्रपट तयार करण्यात आले आहेत. जवळपास एकाच कथेला घेऊन गदरपासून बेबीपर्यंत तयार झालेल्या या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंत केले. यामध्ये मुख्य नायक मिशन पूर्ण करून भारतात परततो. हे सारे चित्रपट भारतीयांच्या भावनांशी जोडले गेले आहेत. याच कथेवर आधारित मसाला चित्रपट मात्र फारसे चालत नाहीत. चित्रपट विश्लेषकांच्या अनुसार पाकिस्तानविरोध म्हणून काहीही दाखविले तरी चित्रपट चालतो असे नव्हे. भारतीयांच्या भावनेशी जोडले गेलेले पाकिस्तानी विरोधी चित्रपट अधिक चालतात. भारतीयांच्या भावनेशी जोडला गेलेला साधा चित्रपट ‘बजरंगी भाईजान’प्रमाणे इतिहास रचतो.