Indian Idol 12 : शोचे परिक्षण करण्यासाठी नेहा कक्कर घेते इतके मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 12:56 PM2021-07-13T12:56:42+5:302021-07-13T12:57:21+5:30

नेहा कक्कर सध्या छोट्या पडद्यावरील सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२चे परीक्षण करताना दिसते.

Indian Idol 12: Neha Kakkar takes so much honorarium to test the show, you will be amazed to read the number | Indian Idol 12 : शोचे परिक्षण करण्यासाठी नेहा कक्कर घेते इतके मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

Indian Idol 12 : शोचे परिक्षण करण्यासाठी नेहा कक्कर घेते इतके मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

नेहा कक्कर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय नाव आहे. आजच्या तरूणाईला ती आपल्या सुरेल आवाजात थिरकायला लावते. सध्या ती छोट्या पडद्यावरील सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२चे परीक्षण करताना दिसते. या शोमुळे तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागतो.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही आपली वेगळी ओळख बनवली आहे. तिचा फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप आहे. त्यामुळे ती मानधन देखील तगडेच घेत असणार. सध्या ती इंडियन आयडॉल १२ शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. ती एका एपिसोडसाठी ५ लाख रुपये मानधन घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेहा कक्कर इंडियन आयडॉलची सर्वात महागडी परीक्षक आहे.


खरेतर नेहा कक्कर २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल’च्या दुसऱ्या सीझनमध्ये एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल'च्या दहाव्या सीझनचीदेखील परिक्षक होती.


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२ शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. नुकतेच या सीझनच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. ही ट्रॉफी पाहून या शोमधील स्पर्धकांचा उत्साह आणखीन वाढला आहे. तर प्रेक्षकदेखील या शोमध्ये कोण बाजी मारतो हे पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

Web Title: Indian Idol 12: Neha Kakkar takes so much honorarium to test the show, you will be amazed to read the number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.