"धनंजय माने इथेच रहातात का?"एका घटनेमुळे ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात 'अजरामर' डायलाॅग जन्माला आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 07:40 PM2021-04-30T19:40:51+5:302021-04-30T19:42:22+5:30

Ashi Hi Banwa Banwi Famous Dilogue:अशी ही बनवा बनवी आजही हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना तितकीच भुरळ घालतो आणि पोट धरून हसायला भाग पाडतो.

Interesting story behind ashi hi banwa banwi iconic dialogue Dhananjay mane ithech rahtat ka | "धनंजय माने इथेच रहातात का?"एका घटनेमुळे ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात 'अजरामर' डायलाॅग जन्माला आला

"धनंजय माने इथेच रहातात का?"एका घटनेमुळे ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात 'अजरामर' डायलाॅग जन्माला आला

googlenewsNext

'अशी ही बनवा बनवी' सिनेमाची  ३२ वर्षानंतरही जादू कायम आहे. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित सिनेमाने रसिकांची तुफान पसंती मिळवली होती. सिनेमातल्या प्रत्येक व्यक्तिरेखा आजही तितक्याच रसिकांच्या लक्षात आहेत. सिनेमातले डॉयलॉग आजही तितकेच फेमस आहेत. अधून मधून डॉयलॉगचा वापर करत विनोदी मिम्सही व्हायरल होत असतात. यात धनंजय माने इथेच राहतात का ? हा डायलॉग आजही प्रचंड फेमस आहे. हा डायलॉग कसा घडला या मागेही एक खास किस्सा अभिनेता किरण माने यांनी चाहत्यांसह शेअर केला आहे.

 

"खरंतर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरज जाणवली नाही... पण परशा जेव्हा दार ठोठावतो, तेव्हा त्यानं पूर्ण नांव घ्यायची गरज आहे." त्याला कुठलं आडनांव शोभेल? याचा सचिन पिळगांवकर - वसंत सबनीस वगैरे लोक व्ही. शांताराम यांच्या ऑफीसमध्ये विचार करत बसले होते... बरीच आडनांवं सुचत होती पण कुणाचं समाधान होत नव्हतं...एवढ्यात व्ही. शांताराम दाराकडे पाहून म्हणाले, "या या माने.. काय काम काढलंत?"  व्ही. शांताराम यांचे सी.ए. किसन माने आले होते. त्यांना काही कागदपत्रांवर व्ही. शांताराम यांच्या सह्या हव्या होत्या. 'त्या' हाकेनं चर्चेच्या वेळी असं टायमिंग साधलं होतं की त्यांच्या सह्या होईस्तोवर सचिनजी आणि वसंत सबनीसांनी ठरवून टाकलं की त्या पात्राचं आडनाव 'माने' हेच असेल !!!


.. मिटींग संपता-संपता व्ही. शांताराम यांनी किसन मानेंना पुन्हा त्यांच्या केबिन मध्ये बोलावून घेतले आणि हसत-हसत विचारलं की "माने तुमचं आडनाव आमच्या सिनेमातल्या 'धनंजय' या पात्राला वापरायला तुमची काही हरकत नाही ना?" केबिनमध्ये हास्यकल्लोळ उसळला...

"खरंतर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरज जाणवली नाही... पण परशा जेव्हा दार ठोठावतो, तेव्हा त्यानं पूर्ण नांव घ्यायची...

Posted by Kiran Mane on Tuesday, 27 April 2021


...आणि संपूर्ण मराठी मुलखात हास्यकल्लोळ उसळवणारा तो 'अजरामर' डायलाॅग जन्माला आला - "धनंजय माने इथेच रहातात का?"किसन माने यांचे चिरंजीव विक्रम माने माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये आहेत... त्यांनी एक दिवस इनबाॅक्स मध्ये ठकठक केलं "किरण माने इथंच रहातात का?" ...आणि मला ही घटना सांगीतली. लै भारी वाटलं... म्हन्लं, मी हा किस्सा फेसबुकवरून दोस्तलोकांना सांगू का? तुमची काही हरकत नाही ना? नाही तर पुन्हा म्हणाल,
 "हा शुद्ध हलकटपणा आहे माने !" 😂😂😂
- किरण माने.

Web Title: Interesting story behind ashi hi banwa banwi iconic dialogue Dhananjay mane ithech rahtat ka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.