'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, अखेर अर्जुन राहणार अप्पी-अमोलसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 04:53 PM2024-08-20T16:53:39+5:302024-08-20T16:54:34+5:30

Appi Amchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत रंजक वळण आले आहे. अमोलच्या प्रयत्नांमुळे अर्जुन-अप्पी एकत्र येत आहेत.

Interesting twist in 'Appi Amchi Collector' series, Arjun will finally be with Appi-Amol | 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, अखेर अर्जुन राहणार अप्पी-अमोलसोबत

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, अखेर अर्जुन राहणार अप्पी-अमोलसोबत

झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. गावात राहणाऱ्या आणि साध्या घरात वाढलेल्या अपर्णाचा कलेक्टर होण्याचा प्रवास या मालिकेतून रेखाटण्यात आला. या मालिकेतील अप्पी-अर्जुनची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. याशिवाय अप्पी-अर्जुनचा मुलगा छोटा अमोल म्हणजेच सिम्बाच्या भूमिकेलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. आता या मालिकेत रंजक वळण आले आहे. अमोलच्या प्रयत्नांमुळे अर्जुन-अप्पी एकत्र येत आहेत. 

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अर्जुन आर्याला सोडून अप्पी आणि अमोलसोबत राहण्याचा निर्णय घेतो आणि आर्य सोबतचा साखरपुडा मोडतो. सर्वकुटुंब अर्जुनच्या निर्णयाने आनंद साजरा करतात. तर रूपाली मनीला अप्पी आणि अर्जुनला वेगळे करण्याचा प्रयत्न करतेय. विनायक कौटुंबिक जमीन अमोलच्या नावे करतो आणि हे पाहून मनी कागदपत्रे चोरण्याची प्रयत्न करते. अर्जुन अमोलची चित्र पाहून आश्चर्यचकित होतो. कुटुंबाचे लक्ष विचलित करण्यासाठी मनी सगळ्यांना मंदिरात जाण्याचा सल्ला देतो. मंदिरात अमोल आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. घरात कोणी नाही हे पाहून मनी जमिनीची कागदपत्रे चोरते. अप्पी आणि अर्जुनला मनी मावशीनेच हे सगळे घडवून आणल्याची खात्री पटते. 


अर्जुन आणि अप्पी तरीही मनी मावशीला जवळ ठेवून तिला धडा शिकवण्याची योजना आखतात. अप्पी-अर्जुनचा नवीन संसार कसा असेल? मनी मावशीला अप्पी आणि अर्जुन कसा धडा शिकवणार? हे सगळे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Interesting twist in 'Appi Amchi Collector' series, Arjun will finally be with Appi-Amol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.