बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना दिले जाते कमी मानधन, आमिर खानने सांगितले कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 11:04 AM2019-03-08T11:04:16+5:302019-03-08T11:09:24+5:30

आजही  रसिकांना  सिनेमाचा हिरोच महत्त्वाचा वाटतो. मोठा अभिनेता सिनेमात असणे म्हणजे सिनेमा चांगलाच असणार अशी समजुत आजही पाहिली जाते.

International Womens Day 2019 When Aamir khan Revealed why Female Actress Gets Low fees then male Actors | बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना दिले जाते कमी मानधन, आमिर खानने सांगितले कारण?

बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना दिले जाते कमी मानधन, आमिर खानने सांगितले कारण?

googlenewsNext

विविध क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत आणि महिलाही स्वतःला कमी न लेखता स्वतःवर विश्वास ठेवून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सर्वच बाबतीत आज महिलांना समान दर्जा तर मिळाला आहे. मात्र कामाचा मोबदला आजही पूरूषांपेक्षा कमीच दिला जातो. याला बॉलिवूडही अपवाद नाही. गेल्या अनेक वर्षापासून अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमीचे मानधन दिले जाते असे अनेकवेळा अभिनेत्रींनी आपले मत मांडले आहे. मात्र अभिनेत्रींना मानधनाच्या बाबतीत का समाधान मानावे लागेत याविषयीचा मत आमिर खानने मांडले होते.

2017 साली सिक्रेट सुपरस्टारच्या प्रदर्शनावेळी अभिनेत्री जायरा वसीमला समान मानधन दिले जाणार का असा प्रश्न आमिरला विचारण्यात आला होता. यावेळी आमिरने म्हटले होते की, आजही  रसिकांना  सिनेमाचा हिरोच महत्त्वाचा वाटतो. मोठा अभिनेता सिनेमात असणे म्हणजे सिनेमा चांगलाच असणार अशी समजुत आजही पाहिली जाते. रसिक सिनेमात हिरोची लोकप्रियता बघून सिनेमाकडे वळतात. सिनेमाच्या बाबतीत रसिकांमध्ये हीच मानसिकता आजही बघायला मिळते. जेव्हा रसिक हिरो पेक्षा हिरोइनची लोकप्रियता बघून सिनेमागृहाकडे वळतील तेव्हा खरे अभिनेत्रींना जास्त मानधन दिले जाईल. हा बदल होणे गरजेचे आहे. 

Web Title: International Womens Day 2019 When Aamir khan Revealed why Female Actress Gets Low fees then male Actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.