#Interview : चित्रपटाचे माध्यम समाजाला विचार करायला लावणारे -आशुतोष राणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:58 PM2019-08-01T13:58:51+5:302019-08-01T14:21:48+5:30

बॉलिवूडसोबतच मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने कोट्यवधी मनावर राज्य करणारा आशुतोष राणा आगामी ‘चिकन करी लॉ’ चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा एक कोर्ट रुम ड्रामा असून त्यांच्या अपोजीट मकरंद देशपांडेदेखील वकिलाच्या भूमिकेत आहेत. एकंदरीत या चित्रपटाविषयी आणि आशुतोष राणांच्या अभिनय प्रवासाबाबत ‘सीएनएक्स’ने त्यांच्यासोबत मारलेल्या मनसोक्त गप्पा...

#Interview : Film makes the society think about - Ashutosh Rana! | #Interview : चित्रपटाचे माध्यम समाजाला विचार करायला लावणारे -आशुतोष राणा!

#Interview : चित्रपटाचे माध्यम समाजाला विचार करायला लावणारे -आशुतोष राणा!

googlenewsNext

-रवींद्र मोरे
बॉलिवूडसोबतच मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने कोट्यवधी मनावर राज्य करणारा आशुतोष राणा आगामी ‘चिकन करी लॉ’ चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा एक कोर्ट रुम ड्रामा असून त्यांच्या अपोजीट मकरंद देशपांडेदेखील वकिलाच्या भूमिकेत आहेत. एकंदरीत या चित्रपटाविषयी आणि आशुतोष राणांच्या अभिनय प्रवासाबाबत ‘सीएनएक्स’ने त्यांच्यासोबत मारलेल्या मनसोक्त गप्पा...

* या चित्रपटाचे कथानक आणि त्यातील आपल्या भूमिकेबद्दल काय सांगाल?
- हा एक कोर्ट रुम ड्रामा आहे. आपल्या देशात एक विदेशी पर्यटक महिला येते आणि तिच्यावर बलात्कार होतो. यात मी एका वकिलाची भूमिका साकारत असून पीडित महिलेच्या पक्षात केस लढविताना दाखविले आहे. या पीडित महिलेवर काही दिग्गज व्यक्तींकडून अत्याचार केला जातो. त्यामुळे तिच्याकडून कोणीही ही केस लढायला तयार नसतो. मात्र यात मला पूर्णत: प्रामाणिकपणे वकिली करताना आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास करताना दाखविले आहे. मात्र असा काही प्रसंग घडतो, ज्यामुळे संतापात मी ही वकिली सोडून पावभाजीचा व्यवसाय करु लागतो. मात्र जेव्हा या पीडित महिलेची केस येते तेव्हा पून्हा मी काळा कोट परिधान करतो आणि तिच्या पक्षात लढायला तयार होतो.

* आतापर्यंत अनेक कोर्ट रुम ड्रामा चित्रपट आले आहेत, तर या चित्रपटात नेमके वेगळेपण काय आहे?
- हो, आतापर्यंत अनेक असे चित्रपट आले आहेत. मात्र त्यापैकी खूपच कमी चित्रपट असे आहेत की जे आपल्याला विचार करायला मजबूर करतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे चित्रपट तर सातत्याने यायला हवेत, कारण असे चित्रपट आपणास विचार करायला पे्ररित करत असतात. जरी असे अनेक चित्रपट आले आहेत तर का अशा घटना घडणे थांबले आहे का? नाही ना. अगदी लहान मुलींपासून मोठ्या महिलांवर अशा अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. मला तरी वाटते की, जो पर्यंत अशा घटना घडतील तो पर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून वैचारिक अभिव्यक्ती सुरु राहणे गरजेचे आहे.

* कोर्ट रुम ड्रामा चित्रपटांचा आपल्या समाजावर काही परिणाम होतो का?
- कोणतीही घटना घडल्यानंतर आपण सर्वजण कॅँडल लाइट मार्च काढतो, घडलेल्या घटनेला विरोध करतो. एकप्रकारे वैचारिक क्रांतीसारखे वातावरण बघावयास मिळते. तसेच चित्रपट निर्माते चित्रपटांच्या माध्यमातून या घटनांना, या विषयांना उजाळा देत असतात, जेणेकरुन आपण सर्वजण या घटनांबाबत विचार करु शकू.

* आपण चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतात?
- मी सर्वप्रथम कथानकाला प्राधान्य देतो, त्यानंतर कॅरेक्टर किती महत्त्वाचे याच्यावरही भर देतो. कॅरेक्टर महत्त्वाचे नसेल तर त्याचा कथानकावर काही फरक पडतो की, नाही. हे सुद्धा पाहतो. नंतर दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्राधान्य देतो.

* वेब सिरीजचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे, काय सांगाल याबाबत?
- खूपच चांगले आहे. हे सर्व माध्यम असतात. जर अशा माध्यमातून आम्ही आणि आपण जुळत असू तर खूपच उत्कृष्ट आहे. ही एक टेक्निकल क्रांती असून हे आम्हा कलाकारांना अभिव्यक्त होण्यासाठी एक चांगली संधीच आहे.

* तुमच्या आगामी प्रोजेक्टबाबत काय सांगाल?
- माझा एक धर्मा प्रॉडक्शनचा हॉरर चित्रपट येतोय. यशराज बॅनरचाही एक चित्रपट करत आहे. हा चित्रपट याच महिन्यात रिलीज होत आहे आणि दोन वेब प्रोजेक्ट्स आहेत. पैकी एक ऐतिहासिक आहे त्यात मी औरंगजेब यांची भूमिका साकारत आहे. शिवाय माझा एक तमिळ आणि एक तेलुगू चित्रपटदेखील येत आहे.
 

Web Title: #Interview : Film makes the society think about - Ashutosh Rana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.