आमिर खानची मुलगी आयरा लवकरच बांधणार लग्नगाठ? फोटो देतोय साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 07:06 PM2022-07-19T19:06:28+5:302022-07-19T19:09:04+5:30

आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून नुपूर शिखरेला डेट करत आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त करत असतात.

Ira Khan Meet Grandmother Zeenat Hussain With Boyfriend Nupur Shikhare | आमिर खानची मुलगी आयरा लवकरच बांधणार लग्नगाठ? फोटो देतोय साक्ष

आमिर खानची मुलगी आयरा लवकरच बांधणार लग्नगाठ? फोटो देतोय साक्ष

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. आयरा खान आपल्या लव्हलाईफबद्दल काहीही लपवत नाही. ती आपल्या बयफ्रेंडसोबत सतत सोशल मीडियावर दिसून येते. आयरा खान नुपूर शिखरेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे आता जगजाहीर आहे.

आता तिने तिची आजी झीनत हुसैनसोबत काही फोटो शेअर केले आहेत, पण हे फोटो देखील खास आहेत कारण त्यात आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेदेखील दिसत आहे. आमिरच्या मुलीने तिचा बॉयफ्रेंडला आजीला भेटवल्याचा हा फोटो आहे. आजीसुद्धा नुपूरला भेटून फार आनंदी असल्याचे या फोटोत दिसतंय. त्यामुळे दोन्ही कुटुंबानं या दोघांचे लग्न मान्य असल्याचं स्पष्ट होतंय. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होताच फोटो पाहून युजर्सही दोघे लग्न करणार आहेत का? असाच प्रश्न विचारताना दिसत आहे. तुर्तास या फोटोवरुन तरी आमिर खानच्या घरी लवकरच  सनई चौघडे वाजणार असंच दिसतंय.

आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून नुपूर शिखरेला डेट करत आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त करत असतात. आता आयराने तिच्या प्रियकर नुपूरची आजी झीनत हुसैन (आमिरची आई) यांच्याशी ओळख करून दिली आहे.इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना आयराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रँडम फोटो बॉम्ब'. आयरा, नुपूर आणि झीनत हे तिघंही हसत हसत पोज देत आहेत आणि फोटो क्लिक करत आहेत. यावर एका चाहत्याने 'फोटोत सगळे फारच आनंदी दिसतात' अशी कमेंट केली. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने विचारले, 'तुम्ही दोघे लग्न करणार आहात का?'

आयरा आणि नुपूर ज्या प्रकारे एकमेकांच्या जवळ आहेत, त्याचप्रमाणे त्या एकमेकांच्या कुटुंबाच्याही खूप जवळ आहेत असंच या फोटोवरुन स्पष्ट होतंय. या दोघांनी गेल्याच वर्षी त्यांचे नात्याची जाहीर कबुली दिली होती. प्रॉमिस डेच्या दिवशी नुपूरसोबतचा फोटो शेअर करताना आयराने तिच्या अफेअरची माहिती संपूर्ण जगाला दिली. काही दिवसांपूर्वी, अफेअरला 2 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयराने नुपूरसोबतची एक भावनिक पोस्टही शेअर केली होती.

Web Title: Ira Khan Meet Grandmother Zeenat Hussain With Boyfriend Nupur Shikhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.