सलमान खानच्या घरी येणार नवा पाहुणा? अरबाजची दुसरी पत्नी शूरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 08:43 IST2025-04-16T08:43:23+5:302025-04-16T08:43:41+5:30

खरंच प्रेग्नंट आहे अरबाजची दुसरी पत्नी शूरा? मॅटर्निटी हॉस्पिटलबाहेर स्पॉट झालं कपल

is arbaaz khan 2nd wife shura khan pregnant couple visited maternity clinic | सलमान खानच्या घरी येणार नवा पाहुणा? अरबाजची दुसरी पत्नी शूरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा

सलमान खानच्या घरी येणार नवा पाहुणा? अरबाजची दुसरी पत्नी शूरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अरबाज पुन्हा बाबा होणार असल्याचं बोललं जात आहे. अरबाजची दुसरी पत्नी शूरा खान गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. अशातच अरबाज आणि शूराला मॅटर्निटी क्लिनिकबाहेर नुकतंच स्पॉट करण्यात आलं. यामुळे शूरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. 

अरबाज आणि शूराला मंगळवारी(१५ एप्रिल) मॅटर्निटी क्लिनिक बाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. शूराने ओव्हरसाइज टी शर्ट घातलं होतं. मात्र ती अरबाजच्या मागे लपून चालत असल्याचं दिसलं. याआधी शूराने ईद सेलिब्रेशनच्या वेळी पापाराझींना फोटोसाठी पोझ न दिल्याने ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता मॅटर्निटी क्लिनिकबाहेर दोघांना स्पॉट केल्याने पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र शूरा आणि अरबाज मॅटर्निटी क्लिनिकमध्ये नव्हे तर वुमन्स क्लिनिकमध्ये गेल्याचं समोर आलं आहे. 

मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने २०२३ मध्ये शूराशी निकाह केला होता. शूरा एक मेकअप आर्टिस्ट आहे. अरबाजला मलायकापासून अरहान हा मुलगा आहे. आता तो पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र अद्याप याबाबत त्यांनी कोणतीही ऑफिशियल माहिती दिलेली नाही.

Web Title: is arbaaz khan 2nd wife shura khan pregnant couple visited maternity clinic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.