क्रिकेटपटू ऋषभ पंतनंतर या फुटबॉल प्लेअरला डेट करतेय उर्वशी रौतेला? ५ वेळा जिंकलाय चॅम्पियन्स लीग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:09 IST2024-04-13T13:07:45+5:302024-04-13T13:09:52+5:30
Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. दरम्याना आता उर्वशीला तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाल्यासारखे वाटते. ती एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

क्रिकेटपटू ऋषभ पंतनंतर या फुटबॉल प्लेअरला डेट करतेय उर्वशी रौतेला? ५ वेळा जिंकलाय चॅम्पियन्स लीग
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. दरम्याना आता उर्वशीला तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाल्यासारखे वाटते. ती एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या कथित लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. मग ते ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणे असो किंवा #RP या प्रारंभिक अक्षरांसह हॅशटॅग शेअर करणे असो.
याआधी उर्वशी रौतेलाला एका जाहिरातीत कमी उंचीच्या मुलांची खिल्ली उडवल्याबद्दल ट्रोल करण्यात आले होते. एका जाहिरातीमध्ये उर्वशीला नवऱ्यांमध्ये कोणते गुण हवेत हे सांगताना दिसली होती आणि तिने शेअर केले होते की तिला कमी उंचीचे तरूण सापडतात. तिचे हे म्हणणे ऋषभच्या चाहत्यांना आवडले नाही आणि त्यांनी तिला ट्रोल केले.
आता ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर उर्वशी रौतेला पुन्हा चर्चेत आली आहे कारण ती माद्रिद स्पेनमधील एका 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली. अभिनेत्रीने 'सनम रे' गाण्यानंतर तिच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत उर्वशी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू करीम बेंजेमा(Karim Benzema)सोबत पोज देताना दिसते आहे.
डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण
उर्वशीने त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करताच, ती त्याला डेट करत आहे का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. दोघेही चाहत्यांसोबत फोटो क्लिक करताना दिसले. एका युजरने खिल्ली उडवली, 'प्रसिद्ध फ्रेंच फुटबॉलपटू करीम बेंजोमाला भेटणारी पहिली भारतीय अभिनेत्री..' दुसरा म्हणाला, 'ती करीम बेंजेमाला डेट करत आहे का?'
कोण आहे करीम बेंजेमा?
करीम बेंजेमा हा रिहानाचा एक्स बॉयफ्रेंड आहे आणि रियल माद्रिदचा सर्वात यशस्वी फुटबॉल सेन्सेशन आहे. ५ वेळा चॅम्पियन्स लीग जिंकणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे आणि यापूर्वी त्याने बॅलन डी'ओरही जिंकला आहे.