Pippa Teaser: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'पिप्पा' चा दमदार टीझर रिलीज; ईशान खट्टर मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 12:42 PM2022-08-15T12:42:06+5:302022-08-15T15:10:06+5:30
Pippa Movie Teaser Video: स्वातंत्र्यदिनाच्या या खास प्रसंगी, ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांच्या 'पिप्पा' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
Ishaan Khatter Mrunal Thakur Pippa Movie Teaser Video: स्वातंत्र्यदिनाच्या या खास मुहूर्तावर ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)'पिप्पा' (Pippa) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा टीझर खूपच धमाकेदार असून, त्यात देशभक्तीचा रंग स्पष्ट दिसतो. 'पिप्पा' हा युद्धपट आहे, यात ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्या 'द बर्निंग चाफीज' या पुस्तकावर आधारित आहे.
पिप्पा चित्रपटाचा हा टीझर व्हिडिओ मृणाल ठाकूर आणि ईशान खट्टर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पिप्पाच्या टीझरबद्दल बोलायचे झाले तर तर 1 मिनिट 07 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये 3 डिसेंबर 1971 रोजी देशाच्या सैनिकांसह संपूर्ण देश रेडिओवर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना ऐकत असल्याचे दाखवण्यात आले आहे. 'काही तासांपूर्वीच पाकिस्तानने भारतीय हवाई तळांवर हवाई हल्ले केले. मी, भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी, पाकिस्तानशी युद्धाची घोषणा करते. जय हिंद....
'पिप्पा' चित्रपटाची रिलीज डेट
यादरम्यान टीझर व्हिडिओमध्ये मृणाल ठाकूर आणि ईशान खट्टरचे सीनही दिसत आहेत. टीझरमध्ये ईशान युद्धभूमीवर दिसत आहे. अभिनेत्याची भूमिका अतिशय सशक्त आहे. या टीझर व्हिडिओसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही आऊट करण्यात आली आहे. ईशान खट्टरचा 'पिप्पा' चित्रपट 2 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित, 'पिप्पा'मध्ये ईशान कॅप्टन बलराम सिंग मेहता यांची भूमिका साकारणार आहे. जे 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताच्या पूर्व आघाडीवर लढले होते. या लढाया गरीबपूर येथे झालेल्या १२ दिवसांच्या युद्धावर आधारित आहेत, ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली.