Kapil Sharmaला गिन्नीसोबत रिलेशनशीपमध्ये राहणं वाटत होतं अशक्य, कॉमेडियननं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 11:17 AM2022-01-11T11:17:39+5:302022-01-11T11:18:09+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma)ने आजवर आपल्या विनोदांनी अनेकांना हसवले आहे. पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी ...

It seemed impossible for Kapil Sharma to be in a relationship with Ginny, the comedian revealed | Kapil Sharmaला गिन्नीसोबत रिलेशनशीपमध्ये राहणं वाटत होतं अशक्य, कॉमेडियननं केला खुलासा

Kapil Sharmaला गिन्नीसोबत रिलेशनशीपमध्ये राहणं वाटत होतं अशक्य, कॉमेडियननं केला खुलासा

googlenewsNext

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma)ने आजवर आपल्या विनोदांनी अनेकांना हसवले आहे. पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आय अॅम नॉट डन येट ( 'I'm Not Done Yet' ) नावाचा शो करणार आहे. या शोचा ट्रेलर आला आहे, ज्यावरून तो एक स्टँड-अप कॉमेडी शो असल्याचे समजते आहे. ट्रेलरमध्ये तो पत्नी गिन्नी चतरथ (Ginni Chatrath)सोबत विनोद करताना दिसत आहे. या शो शिवाय कपिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, एक वेळ अशी आली होती जेव्हा त्याने गिन्नीला सांगितले होते की त्यांचे नाते शक्य नाही.

कपिलने 'द मॅन' मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पत्नीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, गिन्नी विद्यापीठात त्यांची विद्यार्थिनी होती आणि नंतर सहाय्यक बनली. ती जालंधरच्या एका गर्ल्स कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करत होती. ३-४ वर्षे ती ज्युनिअर होती आणि मी एका महाविद्यालयात कमर्शियल आर्ट्समध्ये पीजी डिप्लोमा करत होतो. पॉकेट मनीसाठी मी थिएटरमध्ये भाग घ्यायचो आणि अनेक कॉलेजमध्ये जाऊन अभिनय करायचो. त्यावेळी ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. आताही लग्नानंतर ती माझी गुरू झाली आहे. ती नाटकातील स्किट्स आणि हिस्ट्रिओनिक्समध्ये चांगली होती, म्हणून मी तिला माझा असिस्टंट बनवले आहे.

तेव्हा मला कळलं की तिला मी आवडतो
कपिलने पुढे खुलासा केला की, त्याने गिन्नीला सांगितले होते की हे नाते अजून काळ टिकणार नाही. तो म्हणतो, 'जेव्हा मी तिला असिस्टंट बनवले आणि एकत्र काम करू लागलो, तेव्हा मला कळले की तिला मी आवडतो आहे. मग मी तिला समजावून सांगितले की, तू ज्या गाडीतून येतेस त्याची किंमत माझ्या कुटुंबाच्या खर्चापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच आमच्यात हे नाते शक्य नाही.
१२डिसेंबर २०१८ ला कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथने जालंधरमध्ये लग्न केले. त्यांना आता दोन मुले आहेत. मुलीचे नाव अनैरा आणि दुसऱ्या मुलाचे नाव त्रिशान आहे.

Web Title: It seemed impossible for Kapil Sharma to be in a relationship with Ginny, the comedian revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.