"दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं, पण..", रीना रॉय आणि पत्नीला एकत्र डेट करत होते शत्रुघ्न सिन्हा, दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 09:45 AM2024-12-12T09:45:36+5:302024-12-12T09:46:12+5:30
Shatrughan Sinha : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्नी पूनम सिन्हा आणि सहकलाकार रीना रॉय यांच्यासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
बॉलिवूडमध्ये शॉटगन म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी पत्नी पूनम (Poonam Sinha) आणि रीना रॉय (Reena Roy) यांना एकाच वेळी डेट करत असल्याची कबुली दिली. याचा खूप पश्चाताप होत असल्याचेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी त्यांना एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी खूप मदत केली आहे. त्रिकोणी प्रेमात अडकल्याने महिलांवर तसेच अडकलेल्या पुरुषावर खोलवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतीच 'लेहरें रेट्रो'ला मुलाखत दिली. यावेळी, अभिनेत्याला त्यांच्या आधीच्या एका विधानाबद्दल विचारण्यात आले ज्यात त्यांनी म्हटले होते की ते दोन वेगवेगळ्या बोटीतून प्रवास करत आहे. त्यावर सिन्हा म्हणाले की, दोन बोटी? मी तर म्हणेन की मी तर कधी कधी बऱ्याच बोटींवर होतो.पुढे ते म्हणाले की, 'मी नाव घेणार नाही. पण, माझ्या आयुष्याचा भाग असलेल्या सर्व महिलांचा मी ऋणी आहे. माझी कोणावरही तक्रार नाही, त्यांच्याबद्दल मी कधी वाईट विचारही केला नाही.
स्टारडमला कसे सामोरे जावे हे माहित नव्हते
या मुलाखतीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी असा खुलासाही केला की, त्या काळात सर्वकाही कसे घडले ते समजले नाही. त्याचवेळी पत्नी पूनम आणि रीना या दोघींसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुलीही त्यांनी दिली. ते म्हणाले की, 'माझ्या आयुष्यात अनेक चुका झाल्या आहेत. पाटणातून आलेल्या मुलासाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती, तो इंडस्ट्रीच्या झगमगाटीत हरवून गेला होता. त्याला स्टारडमला कसे सामोरे जावे हेच कळत नव्हते. लोक त्यात हरवून जातात. तेव्हा माझ्याकडे कोणी मार्गदर्शक नव्हता, पण पूनम आल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाला, तिने मला खूप मदत केली.
दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं
शत्रुघ्न सिन्हा यांनी रीना यांचे नाव न घेता म्हटले की, 'मी तिचा आभारी आहे. तिच्याकडून मला खूप प्रेम मिळाले आणि खूप काही शिकायला मिळाले. जेव्हा माणूस मनाने चांगला असतो आणि तो एकाच वेळी दोन नात्यात अडकतो तेव्हा त्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या बाबतीत खूप त्रास सहन करावा लागतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या पत्नीसाठी वाईट वाटते आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीसोबत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या मैत्रिणीबद्दल वाईट वाटते.'