स्टार वॉर... कंगना-हृतिक पुन्हा एकदा आमने सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 09:03 PM2018-07-22T21:03:35+5:302018-07-22T21:04:35+5:30

क्वीन कंगना राणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्या 'अजब प्रेम की गजब कहानी'चा एक गाजलेला अध्याय तुम्ही आम्ही जाणतोच.

It’s Official! Kangana Ranaut & Hrithik Roshan Will Lock Horns At Box Office January 2019 | स्टार वॉर... कंगना-हृतिक पुन्हा एकदा आमने सामने

स्टार वॉर... कंगना-हृतिक पुन्हा एकदा आमने सामने

googlenewsNext

मुंबई : क्वीन कंगना राणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्या 'अजब प्रेम की गजब कहानी'चा एक गाजलेला अध्याय तुम्ही आम्ही जाणतोच. प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली आहे. केवळ बोललीच नाही तर हृतिकबद्दल मनात असली नसली सगळी भडास तिने बाहेर काढली होती. त्यावेळी दोघानींही एकमेंकावर आरोपप्रत्यारोपाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. आता पुन्हा एकदा ही जोडी आमनेसामने येणार आहे. परंतु त्यांच्यातील हा सामना बॉक्स ऑफिसवर असणार आहे. कंगना रनौत हिचा बहुचर्चित  'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि ह्रतिकचा 'सुपर 30' हे चित्रपट एकाच दिवशी म्हणजे 25 जानेवारी2019 ला प्रदर्शित होणार आहेत. 

कंगना रनौत आणि ह्रतिक रोशन यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. कंगनाने माध्यमासमोर ह्रतिकला 'सिली एक्स' म्हटले होते. असे म्हटल्याने तिने जणूकाही त्यांच्यातील नात्याचा सूचक इशाराच दिला होता. या दोघांमधील वाद इतका वाढला होता की, दोघांनाही याप्रकरणी कायदेशीर मदत घ्यावी लागली. दोघांचेही चित्रपट पुढल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला प्रदर्शित होणार आहेत. शनिवारी 'मणिकर्णिका.'चे निर्माते कमल जैन यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली. तर सुपर 30 च्या 26 जानेवारी 2019 मध्ये रिलीज होणार असल्याचे याआधीज जाहिर करण्यात आले होते. 

काय आहे सुपर ३० ची स्टोरी - 
सुपर ३० या चित्रपटात हृतिक एका शिक्षकाची भूमिका साकारतो आहे.  या चित्रपटाच्या माध्यमातून  पहिल्यांदा ऋतिक शिक्षकाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.  ऋतिक यात गणिताचे जादूगर आनंद कुमार यांची भूमिका साकारतो आहे.  आनंद कुमार बिहारमध्ये ‘सुपर ३०’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आतापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून निवडक ३० विद्यार्थी ते पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्याखाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी, भाऊ आणि आई मदत करतात.  

'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' ची स्टोरी - 

'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत. बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.

Web Title: It’s Official! Kangana Ranaut & Hrithik Roshan Will Lock Horns At Box Office January 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.