भाईजानच्या दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने; रागाच्या भरात लुलियाने दिला सलमानसोबत फोटो काढण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 04:20 PM2021-10-26T16:20:00+5:302021-10-26T16:20:00+5:30

Salman khan: सलमानला पाहिल्यावर छायाचित्रकारांनी त्याच्याभोवती घोळका करत फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी लुलियाला पाहून अनेकांनी तिला सलमानसोबत पोझ देण्यास सांगितलं. मात्र, ती तेथून लगेचच निघून गेली.

iulia vantur refuses to pose with salman khan on aayush sharma birthday party | भाईजानच्या दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने; रागाच्या भरात लुलियाने दिला सलमानसोबत फोटो काढण्यास नकार

भाईजानच्या दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने; रागाच्या भरात लुलियाने दिला सलमानसोबत फोटो काढण्यास नकार

googlenewsNext
ठळक मुद्देलुलियाच्या अशा वर्तनामागे सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगिता बिजलानी जबाबदार असल्याचं म्हटलं जातं.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे (salman khan) जितके चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतात. तितकीच चर्चा त्याच्या पर्सनल लाइफविषयी होत असते. यात खासकरुन त्याचे अफेअर्स आणि गर्लफ्रेंडची चर्चा होताना दिसते. ऐश्वर्या राय (aishwarya rai) , संगिता बिजलानी(sangeeta bijlani) , कतरिना कैफ (katrina kaif) अशा कित्येक अभिनेत्रींसोबत सलमानचं नाव जोडलं गेलं आहे. यामध्येच सध्या सलमान लुलिया विंतुरला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या दोघांनीही अद्याप जाहीरपणे त्यांचं नात मान्य केलेलं नाही. परंतु, अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात येतं. अलिकडेच या दोघांना 'अंतिम'च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात पाहायला मिळालं. मात्र, यावेळी लुलिया (iulia vantur) सलमानवर नाराज असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या नाराजीमागे सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगिता बिजलानी असल्याचं म्हटलं जातं आहे.

सध्या सोशल मीडियावर सलमान आणि लुलियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान आणि लुलिया एका कारमधून उतरतात. यात सलमानला पाहिल्यावर छायाचित्रकारांना सलमानभोवती घोळका करत त्याचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी लुलियाला पाहून अनेकांनी तिला सलमानसोबत पोझ देण्यास सांगितलं. मात्र, ती तेथून लगेचच निघून गेली.

लुलियाला असं जातांना पाहून सलमाननेदेखील तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र,ती काहीही न ऐकता निघून गेली. विशेष म्हणजे लुलियाचा हा अॅटिट्यूड पाहून भाभीजी नाराज हैं क्या ? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ नीट पाहिला तर लुलियाच्या अशा वर्तनामागे सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगिता बिजलानी जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. कारण, लुलिया ज्या दिशेने जात आहे. त्या हॉलच्या दरवाजावर संगिता बिजलानी उभी आहे. त्यामुळे संगिताला पाहिल्यावर लुलिया चिडली की काय असा प्रश्न युजर्स विचारत आहेत. 

Web Title: iulia vantur refuses to pose with salman khan on aayush sharma birthday party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.