जबरा फॅन : एक लाख रुपयात घेतले चित्रपटाचे तिकीट
By Admin | Published: January 15, 2017 11:18 AM2017-01-15T11:18:15+5:302017-01-15T11:20:00+5:30
यावेळी हा जो जबरा फॅन आहे तो रजनीकांत यांच्यासाठी वेडा नाही, तर तो जबरा फॅन आहे स्टार बाळकृष्ण यांचा.
नवी दिल्ली, दि. 15 - आपल्या आवडत्या कलाकारासाठी फॅन कोणत्याही थराला जायला तयार असतात. मग ते बॉलिवूड असो अथवा टॉलिवूड असो प्रत्येक ठिकाणी चाहते असतातचं. तमीळ चित्रपटाचे चाहते तर काहीही करायला तयार असात हे आपल्यला रजनीकांत, कमल हसन यांच्या चाहत्याकडून पाहिलं आहेच. सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी तर ते देवाप्रमाणे आहेत. रजनीकांतच्या फोटोला दाक्षिणात्य भागात दुग्धाने भिषेकही केला जातो.
मात्र, यावेळी हा जो जबरा फॅन आहे तो रजनीकांत यांच्यासाठी वेडा नाही, तर तो जबरा फॅन आहे स्टार बाळकृष्ण यांचा. बाळकृष्ण यांचा 100 वा चित्रपपट असलेला गौतमीपुत्र शतकर्णी या चित्रपटाते 500 रुपयांचे तिकीट त्याने एक लाख रुपयात विकत घेतलं आहे. गोपीचंद ईन्नमूरी असे या जबरी फॅनचे नाव असलेला हा व्यक्ती बालाकृष्णाचा मोठा चाहता आहे. गेल्या एक वर्षापासून चित्रपटासाठी पैसे गोळा करत होता.
दरम्यान, बाळकृष्ण यांनी त्यांचा चित्रपटातून मिळणारे काही पैसे कॅन्सरग्रस्तांना देण्यार असल्याचे स्पष्ट केले आहे. अभिनेता बालाकृष्ण हा एक इंडो-अमेरिकन कॅन्सर रुग्णालय चालवतो. कॅन्सर पीडितांसाठी चालविण्यात येणा-या संस्थेला सदर चित्रपटातून मिळणा-या नफ्यातून मदत करण्याचा त्याचा उद्देश आहे. केवळ याच कारणामुळे बालाकृष्णचा चाहता असलेल्या गोपीचंदने एक लाख रुपयाचे तिकीट विकत घेतले आहे.