Jackie Shroff Birthday : बंगला गहाण, लेकराचा बेडही विकला; ‘त्या’ बी ग्रेड सिनेमाच्या नादात जॅकी श्रॉफचं दिवाळं निघालेलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 10:59 AM2023-02-01T10:59:49+5:302023-02-01T11:00:17+5:30

Jackie Shroff Birthday : ‘हिरो’ या एका चित्रपटाने जॅकी दादा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. एका रात्रीत सुपरस्टार झाला. याच जॅकीच्या आयुष्यात एक काळ असा आला की, त्याला घरदार गहाण ठेवावं लागलं...

Jackie Shroff Bank Corrupt After Wife Ayesha Shroff Film Boom Flopped | Jackie Shroff Birthday : बंगला गहाण, लेकराचा बेडही विकला; ‘त्या’ बी ग्रेड सिनेमाच्या नादात जॅकी श्रॉफचं दिवाळं निघालेलं...

Jackie Shroff Birthday : बंगला गहाण, लेकराचा बेडही विकला; ‘त्या’ बी ग्रेड सिनेमाच्या नादात जॅकी श्रॉफचं दिवाळं निघालेलं...

googlenewsNext

Jackie Shroff Birthday : जॅकी श्रॉफने देव आनंद यांच्या 1982 मध्ये प्रदर्शित ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याला खरी ओळख दिली ती सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटाने. या एका चित्रपटाने जॅकी दादा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. एका रात्रीत सुपरस्टार झाला. ‘हिरो’ सुपरडुपर ब्लॉकबस्टर झाल्यावर प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक जॅकीला साईन करण्यासाठी उत्सुक होते. इतके की, जॅकी पब्लिक टॉयलेटमध्ये असेल तरीही अनेक निर्माता-दिग्दर्शक टॉयलेटबाहेर त्याची वाट पाहत बसायचे. याच जॅकीच्या आयुष्यात एक काळ असा आला की, त्याला घरदार गहाण ठेवावं लागलं. घरातील वस्तू विकण्याची वेळ त्याच्यावर आली.

तर आयुष्याच्या एका वळणावर जॅकीनं स्वत: एक चित्रपट प्रोड्यूस करण्याचा निर्णय केला. या चित्रपटाचं नाव होतं ‘बूम’. कतरिना कैफ, अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोव्हर, पद्मा लक्षमी असे अनेक स्टार्स या सिनेमात होते.  ‘बूम’ हिट हाेईल, असा जॅकीचा अंदाज होता.  मात्र झालं भलतंच. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला पहिला जोरदार धक्का दिला. सेन्सॉर या चित्रपटाला बी ग्रेड चित्रपटांच्या कॅटेगिरीमध्ये टाकलं. कारणही तसंच होतं. कतरिना, गुलशन ग्रोव्हरसह सर्व कलाकारांनी या सिनेमात असे काही बोल्ड सीन्स दिले की, या चित्रपटाला बी ग्रेडचा दर्जा मिळाला.

  
 सेन्सॉर बोर्डाचा हा निर्णय जॅकीसाठी अनपेक्षित होता. अशात त्याला दुसरा धक्का बसला. होय, चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लीक झाला. त्यामुळे जॅकीदाच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही पाण्यात वाहून गेल्या. तिसरा धक्का इतका माेठा होता की, जॅकीला या धक्क्यातून सावरताही आलं नाही. डिस्ट्रीब्युटर्सनी आपले हात वर केले आणि जॅकी पुरता अडचणीत आला. जॅकीने मदतीसाठी अनेक हातपाय मारून बघितले. पण कोणीही त्याच्या मदतीला पुढे आलं नाही.

अखेर जॅकीने त्याचा बंगला गहाण ठेवला. चित्रपट रिलीज झाल्यावर काहीतरी भलं होईल, असं जॅकीला वाटलं. पण सिनेमा रिलीज झाला आणि दणकून आपटला. इथूनच जॅकीचे वाईट दिवस सुरू झालेत. घर गहाण ठेवलं होतंच. आता ज्यांनी ज्यांनी सिनेमात पैसे लावले होते, ते पैशांसाठी तगादा लावू लागले. अखेर जॅकीला आपल्या घरातील मौल्यवान वस्तू, बायकोचे दागिने सगळं काही विकावं लागलं.

 एका मुलाखतीत टायगर श्रॉफ यावर बोलला होता. बूम हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. ते सगळं आठवलं की, आजही अंगावर काटा येतो.  आम्हाला घरातील फर्निचर देखील विकावं लागलं होतं. माझा बेड देखील विकला गेला होता. त्यामुळे मी जमिनीवर झोपायचो. मी लहानाचा मोठा होईपर्यंत ज्या वस्तू मी घरात माझ्या डोळ्यांसमोर पाहिल्या होत्या. त्या वस्तू एक एक करून घरातून जात होत्या. हा काळ आमच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. त्यावेळी मी फक्त 11 वर्षांचा होतो. घरात काय सुरू आहे हे कळण्याचं माझं ते वय नव्हतं, असं टायगर म्हणाला होता.

Web Title: Jackie Shroff Bank Corrupt After Wife Ayesha Shroff Film Boom Flopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.