जॅकी श्रॉफने अनिल कपूरच्या तब्बल 17 वेळा मारली होती कानाखाली, वाचा काय आहे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 06:06 PM2021-05-29T18:06:23+5:302021-05-29T18:07:56+5:30

हा किस्सा त्याकाळात चांगलाच गाजला होता.

Jackie Shroff reveals why he once slapped Anil Kapoor 17 times | जॅकी श्रॉफने अनिल कपूरच्या तब्बल 17 वेळा मारली होती कानाखाली, वाचा काय आहे प्रकरण

जॅकी श्रॉफने अनिल कपूरच्या तब्बल 17 वेळा मारली होती कानाखाली, वाचा काय आहे प्रकरण

googlenewsNext
ठळक मुद्देविधु विनोद चोप्राने सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत याविषयी सांगितले होते.

अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफने राम लखन, त्रिमूर्ती, युद्ध, अंदाज अपना, रूप की रानी चोरों का राजा, कभी ना कभी असे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्या दोघांच्या बाबतीतला एक किस्सा काही महिन्यांपूर्वी निर्माता विधु विनोद चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला होता. हा किस्सा जवळजवळ 30 वर्षांपूर्वीचा आहे.

विधु विनोद चोप्राने सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत याविषयी सांगितले होते. या व्हिडिओत आपल्याला विधु विनोद चोप्रा शिवाय अनुराग कश्यप, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांना पाहायला मिळाले होते. या व्हिडिओत अनिल आणि जॅकी परिंदा या चित्रपटाविषयी सांगत होते. या व्हिडिओसोबत विधु विनोद चोप्राने लिहिले होते की, अनिल नेहमीच त्याच्या कामाच्याबाबतीच अतिशय परफेक्ट असतो. एखादे दृश्य चांगले होत नाही तोपर्यंत तो रिटेक देत असतो. एकदा तर एक शॉर्ट चांगला येण्यासाठी अनिलने 17 रिटेक दिले होते.

या व्हिडिओत आपल्याला परिंदा या चित्रपटातील एक दृश्य पाहायला मिळत आहे. या दृश्यात अनिल आणि जॅकी यांच्यात प्रचंड भांडणं सुरू असून रागाच्या भरात जॅकी अनिलच्या कानाखाली मारताना दिसत आहे. या व्हिडिओत जॅकी सांगत आहे की, मोठ्या भावाने कानाखाली मारल्यानंतर काय त्रास होऊ शकतो हे अनिलला या दृश्यात दाखवायचे होते. पहिलाच शॉर्ट अतिशय मस्त झाला होता. अनिलच्या चेहऱ्यावरचे भाव देखील एकदम परफेक्ट होते. पण अनिलने केवळ या दृश्यासाठी अजून एक अजून एक म्हणत चक्क 17 कानाखाली खालल्या.

Web Title: Jackie Shroff reveals why he once slapped Anil Kapoor 17 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.