जग्गू दादाचा स्वॅग! CM च्या घरी बाप्पाच्या आरतीमध्ये तल्लीन झाले जॅकी श्रॉफ ; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 01:02 PM2023-09-25T13:02:13+5:302023-09-25T13:03:39+5:30

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी होती.

jackie shroff video from CM house ganesh arati suniel shetty also seen with him | जग्गू दादाचा स्वॅग! CM च्या घरी बाप्पाच्या आरतीमध्ये तल्लीन झाले जॅकी श्रॉफ ; Video व्हायरल

जग्गू दादाचा स्वॅग! CM च्या घरी बाप्पाच्या आरतीमध्ये तल्लीन झाले जॅकी श्रॉफ ; Video व्हायरल

googlenewsNext

देशभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. १० दिवस बाप्पाचे लाड करण्यात भाविक मग्न आहेत. घरोघरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पाहुण्यांची रीघ लागत आहे. सेलिब्रिटीही गणेशभक्तीत तल्लीन झाले आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी होती. यावेळी 'अपना भिडू' जग्गू दादाचा आपला एक वेगळा स्वॅग पाहायला मिळाला. जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) टाळ वाजवत आरतीमध्ये तल्लीन झाले होते. 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सलमान खान, शाहरुख खानसह आशा भोसले, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, पंकज त्रिपाठी अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं शाल, पुष्पगुच्छ आणि गणपतीची मूर्ती देऊन स्वागत केलं. नंतर गणेश आरती झाली. यावेळी जग्गू दादाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. जॅकी दादा त्यांच्या स्टाईलमध्ये आरतीमध्ये मग्न होऊन टाळ वाजवत होते. बाजूला उभा असलेले सुनील शेट्टी, मिजान जाफरी, अर्जुन रामपाल, पंकज त्रिपाठी त्यांच्याकडे पाहतच राहिले. जॅकी श्रॉफ यांचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

जग्गू दादा नेहमीच त्यांच्या हटके स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेतात. 'भिडू' म्हणत ते सर्वांची आपुलकीने विचारपुस करतात. जॅकी श्रॉफ पर्यावरण वाचवण्यासाठी आणि जास्तीत जास्त झाडं लावण्यासाठी पुढाकार घेत असतात. यासाठी ते अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना जोडले गेले आहेत.जॅकी श्रॉफ यांचा बॉलिवूडमध्ये निराळा अंदाज आहे.

Web Title: jackie shroff video from CM house ganesh arati suniel shetty also seen with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.