सलमान खानला जॅकलिनने म्हटले ‘नो’!
By Admin | Published: April 24, 2017 01:42 AM2017-04-24T01:42:12+5:302017-04-24T01:42:12+5:30
सलमान खानसोबतच्या ‘किक’ चित्रपटानंतर जॅकलिन फर्नांडिस हिचे नशीब चांगलेच फळफळले होते. ‘किक’ या चित्रपटानंतर तिची स्टार व्हॅल्यू एकदम वाढली होती.
सलमान खानसोबतच्या ‘किक’ चित्रपटानंतर जॅकलिन फर्नांडिस हिचे नशीब चांगलेच फळफळले होते. ‘किक’ या चित्रपटानंतर तिची स्टार व्हॅल्यू एकदम वाढली होती. हा चित्रपट खऱ्या अर्थाने जॅकच्या करिअरमधील टर्निंग पॉर्इंट ठरला होता; पण आता म्हणाल, तर जॅकलिनने सलमान खानसोबत चित्रपट करायला ‘ना’ केली आहे. होय, साक्षात सलमानला जॅकने ‘ना’ म्हटले आहे.
आता जॅकच्या या नकारामागचे कारण काय तर डेट्स. होय, जॅकलिन सध्या इतकी बिझी आहे, की तिच्याकडे अजिबात डेट्स नाहीत. सलमानचा ‘जुगलबंदी’ चित्रपट लवकरच फ्लोरवर येणार आहे. या चित्रपटात जॅक असावी, अशी सलमानची इच्छा होती; पण जॅकलिनने आधीच अनेक चित्रपट साईन केले आहेत. करण जोहरच्या ‘ड्राईव’मध्ये जॅकलिन सुशांतसिंह राजपूतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. यानंतर ‘जुडवा 2’ या चित्रपटातही जॅकलिन आहे. या सिनेमात जॅकलिन वरुण धवन व तापसी पन्नू यांच्यासोबत दिसेल. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जॅकलिन लकवरच न्यूयॉर्कला रवाना होणार आहे. त्यामुळे या चित्रपटात ती सप्टेंबरपर्यंत बिझी आहे. याशिवाय, ‘रिलोड’ या चित्रपटातही जॅकलिन सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.