पती अन् मुलासह सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली जान्हवी किल्लेकर, साजरी केली भाऊबीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:53 PM2024-11-05T12:53:22+5:302024-11-05T12:53:53+5:30

जान्हवीने सूरज चव्हाणची त्याच्या गावी जाऊन भेट घेतली आहे.

Jahnavi Killekar And Suraj Chavan Celebrated Bhaubeej 2024| Bigg Boss Marathi | पती अन् मुलासह सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली जान्हवी किल्लेकर, साजरी केली भाऊबीज!

पती अन् मुलासह सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली जान्हवी किल्लेकर, साजरी केली भाऊबीज!

Jahnavi Killekar And Suraj Chavan Bhaubeej : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi)  यंदाचं पर्व चांगलच गाजलं. 'बिग बॉस' संपलं असलं तरी त्यातील स्पर्धक मैत्रीचं नात जपताना दिसत आहे. नुकतंच 'किलर गर्ल' जान्हवी किल्लेकर (Jahnavi killekar) आणि सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी भाऊबीज साजरी केली. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. 

भाऊबीजेच्या सणाला जान्हवी किल्लेकरने थेट सूरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत तिचा पती किरण किल्लेकर व मुलगा इशान हेदेखील होते. जान्हवीने सुरजसोबतचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, "भाऊबीज तु फक्त एक हाक मार मी कायम तुझ्या सोबत आहे". सोशल मीडियावर सूरज-जान्हवीचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 


 

'चांगभलं न्यूज'शी बोलताना जान्हवी म्हणाली, "मी आज यायचंच असं ठरवून आले होते. भाऊबीज आहे त्यामुळे माझ्या भावाला भेटण्यासाठी खास मी आज आले आहे. तसं मी त्याला वचन दिलं होतं. मी गेल्यावेळी आले, तेव्हा त्याला सांगितलं होतं. भाऊबीजेला नक्की येईन आणि तो शब्द मला पाळायचा होता. 'बिग बॉस'च्या घरात मी सूरजला राखी सुद्धा बांधली होती. त्याच्यामुळे यायचं हे १०० टक्के ठरलं होतं". 


रक्षाबंधनाच्या सणाला जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांनी 'बिग बॉस'च्या घरात रक्षाबंधन साजरं केलं होतं. जान्हवीशिवाय, डीपी वैभव, इरिना हे देखील कोल्हापुरात सुरजच्या भेटीला पोहचले. याचे फोटो डीपीने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 



 

Web Title: Jahnavi Killekar And Suraj Chavan Celebrated Bhaubeej 2024| Bigg Boss Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.