जान्हवी की खुशी कपूर, दोन बहिणींमध्ये कोणाचा बॉयफ्रेंड आहे श्रीमंत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 03:57 PM2024-11-15T15:57:04+5:302024-11-15T16:00:03+5:30
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतात.
Janhvi Kapoor And Khushi Kapoor : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या लेकी जान्हवी कपूर आणि खुशी कपूर. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवी कपूरनेबॉलिवूडमध्ये आपली पकड मजबूत केली आहे, तर अलिकडे खुशीचा डेब्यू चित्रपट The Archies ही रिलीज झाला आहे. या दोघी व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर नेहमी त्यांचे फोटो व्हायरल होत असतात.
एकीकडे जान्हवी शिखर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जान्हवी आणि शिखर यांना अवॉर्ड शो , पार्ट्यांमध्ये एकत्र एन्ट्री करताना अनेकदा सगळ्यांनीच पाहिलंय. त्यांनी प्रेमात असल्याची कबुलीही दिली आहे. तर दुसरीकडे धाकटी बहीण खुशी कपूर अभिनेता वेदांग रैनासोबतच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्यामध्ये कोणाच्या बॉयफ्रेंडची जास्त संपत्ती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? शिखर पहाडिया हा राजकीय कुटुंबातून आले आहेत. शिखरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. सुशीलकुमार शिंदे यांची मोठी मुलगी स्मृती पहाडिया यांचा तो मोठा मुलगा. जान्हवी आणि शिखर लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघांनीही एकत्र शिक्षण घेतले आहे. 1996 साली मुंबईत जन्मलेला शिखर हा बिझनेसमन असण्यासोबतच एक प्रोफेशनल पोलो प्लेयरदेखील आहे. रिपोर्टनुसार शिखरची एकूण संपत्ती 84 कोटी रुपये आहे.
वेदांग रैनाने खुशी कपूरसोबतच्या 'द आर्चीज'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं बोललं जातं. अभिनेता असण्यासोबतच वेदांग एक गायक आणि मॉडेल देखील आहे. वेदांग हा काश्मिरी पंडित आहे. वेदांगने 'खालिद तक', 'द वीकेंड्स अर्न्ड इट' सारख्या कव्हरसाठीही परफॉर्म केले आहे. वेदांगचे करिअर नुकतेच सुरू झाले असले तरी रिपोर्टनुसार, सध्या अभिनेत्याची एकूण संपत्ती 3 कोटी रुपये आहे.