बिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo

By नेहा सराफ | Published: July 22, 2019 03:23 PM2019-07-22T15:23:41+5:302019-07-22T15:26:59+5:30

बिग बॉसमुळे जसलीनला खूप पब्लिसिटी मिळाली. मात्र त्यावेळी अनुप जलोटा यांनी जसलीन मथारूला गर्लफ्रेंड बनवणे खूप महागातही पडले. त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणावर सारवासरव करण्याचा प्रयत्न केला.

Jasleen Matharu Bikini Look Viral | बिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo

बिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo

googlenewsNext

''बस नाम ही काफी है' जिच्यासाठी अगदी समर्पक असून जास्त काही सांगणे काही गरजेचे वाटत नाही ती म्हणजे जसलीन मथारू.जसलीन मथारूनेबिग बॉस 13 मध्ये वेगवेगळे कारनामे करत रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. घरात भजनसम्राट अनुप जलोटा यांची प्रेयसी बनत तिने एंट्री केली होती. आजही जसलीन मथारू नाव घेताच समोर अनुप जलोटा आणि त्यांचे कारनामे नाही आठवले तरच नवल. 


आता जसलीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी अनुप जलोटा यांच्यामुळे नाही तर तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या खास फोटोंमुळे. इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे.  तिच्या बोल्ड अंदाजासाठी ती नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.


बिग बॉसमुळे जसलीनला खूप पब्लिसिटी मिळाली. मात्र त्यावेळी अनुप जलोटा यांनी जसलीन मथारूला गर्लफ्रेंड बनवणे खूप महागातही पडले. त्यानंतर त्यांनी  या सगळ्या प्रकरणावर सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. ती फक्त माझी शिष्या आहे आणि मी तिचा गुरू आहे. मी तिला संगीत शिकवतो. आमच्यामध्ये गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डचे कुठलेही नाते नाही. ना आम्ही आजपर्यंत कुठल्या रोमॅन्टिक नात्यात होतो, ना आमच्यात शारीरीक संबंध होते, असे अनुप यांनी सांगितले. 


बिग बॉस शो स्क्रिप्टेड असतो़ जसलीनसोबतचे माझे नाते बिग बॉसने प्लान केले होते, असा दावाही त्यांनी केला होता. गुरू-शिष्य बनून आलात तर शो चालणार नाही, हे मला पटवून देण्यात आले. त्यामुळे गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड बनून आम्ही घरात एंट्री केली होती. घरातील आम्ही दोघांतील वाद, भांडण, नाराजी सगळे काही बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे होते, असा खुलासाही त्यांनी केला.


जसलीनचे वडील माझे चांगले मित्र असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मी जसलीन व तिच्या कुटुंबाला दीर्घकाळापासून ओळखतो़ आम्ही अनेकदा भेटतो, असेही अनुप जलोटा म्हणाले होते.

Web Title: Jasleen Matharu Bikini Look Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.