डोळ्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसली जॅस्मीन भसीन, गॉगल काढून दाखवली स्थिती; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:07 AM2024-07-24T11:07:22+5:302024-07-24T11:08:35+5:30

कॉर्निया डॅमेजनंतर तिच्या डोळ्यांना काही दिवस पट्टी होती. ती प्रचंड वेदनेत होती.

Jasmin Bhasin seen for the first time after an eye injury spotted at Mumbai airport | डोळ्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसली जॅस्मीन भसीन, गॉगल काढून दाखवली स्थिती; Video व्हायरल

डोळ्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसली जॅस्मीन भसीन, गॉगल काढून दाखवली स्थिती; Video व्हायरल

टीव्ही अभिनेत्री जॅस्मीन भसीन (Jasmin Bhasin) बिग बॉस 14 मुळे चर्चेत आली. जॅस्मीनने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. बिग बॉसमुळे जॅस्मीनला आयुष्यभराचा जोडीदारही मिळाला. अली गोनीसोबत तिचं अफेअर तेव्हापासून चर्चेत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच जॅस्मीनच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. कॉर्निया डॅमेज झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यामुळे जॅस्मीन प्रचंड वेदनेत होती. आता ती हळूहळू बरी होत असून नुकतीच विमानतळावर दिसली.

डोळ्यांच्या दुखापतीनंतर जॅस्मीन पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर दिसली. तिने काळा गॉगल लावला होता. गुलाबी शर्ट पँट अशा कॅज्युअल लूकमध्ये ती दिसली. जॅस्मीनने गॉगल काढून डोळे दाखवले आणि आता बरी असल्याचं सांगितलं. कॉर्निया डॅमेजनंतर तिच्या डोळ्यांना काही दिवस पट्टी होती. ती प्रचंड वेदनेत होती. आता तिच्या डोळ्यांची स्थिती सुधारली आहे. जॅस्मीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

जॅस्मीनच्या या कठीण काळात बॉयफ्रेंड अली गोनीने तिची साथ दिली. जॅस्मीनने अलीसाठी खास पोस्टही लिहिली होती. काही दिवस अलीच तिचे डोळे बनल्याचं तिने सांगितलं. जॅस्मीन आता कामावर परतली आहे. दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये असतानाच तिला डोळ्यांना त्रास सुरु झाला होता. लेन्स लावल्याने तिला हा त्रास झाला होता.  दिसत नसतानाही ती इव्हेंटमध्ये होती. नंतर तातडीने ती डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टरांनी कॉर्निया डॅमेज झाल्याचं सांगितलं. थोडा उशीर झाला असता तर काहीतरी भयानक झालं असतं असंही ते म्हणाले.

Web Title: Jasmin Bhasin seen for the first time after an eye injury spotted at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.