...तर असा आहे फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा वेडिंग प्लान, जावेद अख्तर यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:49 PM2022-02-04T14:49:21+5:302022-02-04T14:57:04+5:30

फरहान अख्तर (Farhan Akhtar)आणि शिबानी दांडेकर(Shibani Dandekar) दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

Javed akhtar on farhan akhtar and shibani dandekar wedding on february 21 says invitations are yet to be sent out | ...तर असा आहे फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा वेडिंग प्लान, जावेद अख्तर यांनी केला खुलासा

...तर असा आहे फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा वेडिंग प्लान, जावेद अख्तर यांनी केला खुलासा

googlenewsNext

फरहान अख्तर (Farhan Akhtar)आणि शिबानी दांडेकर(Shibani Dandekar) दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांच्या लग्नाच्या अनेक चर्चा होत्या. नुकतीच दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली असून, दोघेही २१ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.यावर शिबानी आणि फरहानकडून कोणतेही वक्तव आलेले नाही, मात्र फरहानचे वडील म्हणजेच जावेद अख्तर यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी सांगितले की, फरहान आणि शिबानी दोघेही २१ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांचे लग्न खंडाळा येथील जावेद फॅमिली होम येथे अत्यंत साध्या पद्धतीने (Farhan Akhtar-Shibani Dandekar tie the knot on February 21) होणार आहे. 


पाहुण्यांना अजून आमंत्रित केलेले नाही
फरहान अख्तर (Farhan Akhtar)  आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar)यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब करत जावेद अख्तर म्हणाले की, कोविड-१९च्या प्रतिबंधामुळे काही निवडक लोकच लग्नाला उपस्थित राहतील. त्यांनी खुलासा केला की अद्याप आमंत्रणे पाठवली गेली नाहीत, पाहुण्यांना लग्नासाठी आमंत्रित करणे बाकी आहे.

बॉम्बे टाइम्सशी बोलताना त्यांनी सांगितले की, लग्नाची सर्व तयारी वेडिंग प्लॅनर्स करत आहेत. ते म्हणाले की, परिस्थिती लक्षात घेऊन, हे स्पष्ट आहे की आम्ही मोठ्या प्रमाणावर काहीही आयोजित करू शकत नाही. त्यामुळे आम्ही मोजक्याच लोकांना कॉल करत आहोत. हे लग्न अगदी साधेपणाने होणार आहे.

संपूर्ण कुटुंबाला शिबानी आवडते
जावेद अख्तर यांनी यावेळी झालेल्या सुनेचे कौतुक केले. ते म्हणाला की, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिबानी खूप आवडते.

आधी मार्चमध्ये करणार होते लग्न 
याआधी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मार्च 2022 मध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी दोघांनीही तयारी सुरू केली आहे. रिपोर्टनुसार या कपलने लग्नासाठी त्यांचा ड्रेस आणि ठिकाणही फायनल केले आहे. मात्र, अद्याप याला त्यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही आणि कोणतीही प्रतिक्रियाही देण्यात आलेली नाही.
 

Web Title: Javed akhtar on farhan akhtar and shibani dandekar wedding on february 21 says invitations are yet to be sent out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.