सुपरस्टार नयनताराने बॉलिवूडकडे फिरवली पाठ? शाहरुख खानचा 'जवान' ठरला कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:56 AM2023-11-10T11:56:57+5:302023-11-10T11:59:09+5:30
नयनताराने अॅटलीच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
नयनतारा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला 'लेडी सुपरस्टार' म्हणतात. रजनीकांत यांची जशी क्रेझ आहे तशीच क्रेझ नयनतारासाठीही आहे, असेही म्हटले जाते. नयनताराने अॅटलीच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने शाहरुख खानच्या पत्नी नर्मदाची भूमिका साकारली होती. मात्र, आता बातमी समोर येत आहे की, 'जवान'च्या यशाचे श्रेय न मिळाल्याने अभिनेत्री संतापली आहे. ती फक्त साऊथ इंडस्ट्रीतच काम करणार असून आता कुठलाही हिंदी चित्रपट करणार नसल्याचेही बोलले जात आहे.
'टाईम्स नाऊ'च्या रिपोर्टनुसार, 'जवान' हा चित्रपट शाहरुख खान आणि नयनताराचा चित्रपट असणार होता, पण याचे सर्वाधिक श्रेय शाहरुख-दीपिकाला दिले जात आहे.
त्यामुळे नयनताराचे चाहते नाराज आहेत. नयनताराची भूमिका सिनेमातून कमी करण्यात आल्याचं चाहत्यांचं म्हणणे आहे. दीपिकाचा 'जवान' चित्रपटात कॅमिओ होता.
रिपोर्ट्सनुसार, नयनताराने आता ठरवले आहे की ती फक्त साऊथ इंडस्ट्रीत काम करणार आहे. आता ती बॉलिवूडचा कोणताही चित्रपट करणार नाही. अशी माहिती आहे की नयनतारा संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाली होती, त्यानंतर ती भन्साळींच्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. 'बैजू बावरा' संदर्भात दोघांमध्ये चर्चा सुरू होती.
नयनतारा आगामी 'इरायवन' या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमासाठी नयनताराने 10 कोटी रुपये फी घेतल्याचे बोलले जात आहे. 'जवान'साठीही तिने तेवढीच फिस घेतली होती.