‘जवान’चा दिग्दर्शक अॅटली झाला भावूक, शेअर केले १३ वर्षांपूर्वीचे शाहरुख खानशी असलेले खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 04:24 PM2023-08-31T16:24:01+5:302023-08-31T16:30:54+5:30
शाहरुख खानशी कनेक्ट असलेली एक आठवण शेअर करताना दिग्दर्शक अॅटली भावूक झाला.
शाहरुख खानचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'जवान' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. 30 ऑगस्ट रोजी चेन्नईमध्ये 'जवान' चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहरुख खानसह विजय सेतुपती, चित्रपटाचे दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ अॅटली आणि चित्रपटाची इतर स्टारकास्टही जवान’च्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये पोहचली होती. यावेळी शाहरुख खानशी कनेक्ट असलेली एक आठवण शेअर करताना दिग्दर्शक अॅटली भावूक झाला.
#Atlee - 13 years back I took a photo standing infront of SRK's Mannat Gate & now the same open gate opened for me when I first met #SRK to utter the script.He is more than Father to me.. #JawanPreReleaseEvent#Jawan#JawanTrailer#ShahRukhKhan@iamsrk@Atlee_dir… pic.twitter.com/vKmgMY5tzt
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) August 30, 2023
अॅटली यांनी एक मोठा खुलासा केला की, "13 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर उभं राहून त्याची वाट पाहिली आणि एक फोटो काढला होता. आता त्याच घराचे दरवाजे खुद्द शाहरुख खानने माझ्यासाठी उघडले आणि माझी स्क्रिप्ट ऐकून त्यावर काम केलं. तब्बल 13 वर्षांनी शाहरुखबरोबर काम करायचं स्वप्न पूर्ण होत आहे. शाहरुख हे माझ्या वडिलांप्रमाणेच आणि त्यांच्यासोबत काम करणे हा सर्वोत्तम अनुभव आहे". दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून अॅटलीला ओळखले जाते. दिग्दर्शक अॅटली ‘जवान’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
शिवाय, आज 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. किंग खानने स्वतः 'जवान'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला. 2 मिनिटे 47 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये चाहत्यांना ॲक्शन, ड्रामा आणि रोमान्सचा जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळत आहे.
चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपथी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘जवान’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणही झळकणार आहे. याबरोबरच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहरुखचा जवान ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.