सीतेच्या भूमिकेसाठी नॉनव्हेज सोडलं, हॉटेलमधलं पाणीही... अभिनेत्रीने स्वत:वर लावलेले निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 04:11 PM2024-11-20T16:11:20+5:302024-11-20T16:12:38+5:30
या अभिनेत्रीने साकारली रामायणातील सीता. स्वतःसाठी आखलेले कडक नियम
भारतीय मनोरंजन विश्वातील एक अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. या अभिनेत्रीने साऊथसह अलीकडेच हिंदी सिनेमातही काम केलंय. या अभिनेत्रीवर अलीकडेच एक डॉक्यूमेंट्री सुद्धा ओटीटीवर आलीय. ही अभिनेत्री प्रत्येक रोलमध्ये समरसून काम करते. याशिवाय आपण भूमिका कोणाची करतोय याचं या अभिनेत्रीने भान आहे. त्यामुळेच रामायणातील सीतेची भूमिका साकारताना या अभिनेत्रीने मांसाहार सोडलेला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नाव नयनतारा.
नयनताराने सितेच्या भूमिकेसाठी सोडलेला मांसाहार
सध्या नेटफ्लिक्सवर नयनताराच्या आयुष्यावर 'बियॉन्ड द फेयरीटेल' ही डॉक्यूमेंट्री रिलीज झालीय. या फिल्ममध्ये नयनताराच्या एका टीम मेंबरने हा खुलासा केला. जेव्हा नयनताराने श्री राम राज्यम सिनेमातील सीतेच्या भूमिकेसाठी नॉनव्हेज खाणं संपूर्ण टाळलं होतं. नयनतारा या शूटिंगच्या दरम्यान हॉटेल ताज कृष्णामध्ये राहत होती. शूटिंगच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये नयनताराने हॉटेलचं पाणीही प्यायलं नाही. तिच्यासाठी शाकाहारी जेवण बाहेरून यायचं. सीतेची भूमिका रंगवण्यासाठी आणि भूमिकेचं पावित्र्य जपण्यासाठी नयनताराने स्वतःसाठी कडक नियम आखले होते.
नयनताराने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतलेला निर्णय
रामायणातील सीतेच्या भूमिकेचं गांभीर्य ओळखून नयनताराने स्वतःच्या दिनक्रमातही मोठा बदल केलेला. परंतु या सिनेमानंतर नयनतारा फिल्म इंडस्ट्री सोडणार होती. नयनताराचं वैयक्तिक आयुष्य वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. त्यामुळे लोकांनी तिच्यावर टीकेचा भडीमार केलेला. त्यामुळे सर्वांच्या नाराजीला कंटाळून नयनतारा फिल्म इंडस्ट्री सोडणार होती. वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रचंड उलथापालथ सुरु असताना २०११-१२ मध्ये अभिनेत्रीने ब्रेक घेतला. पुढे जुनं सर्व विसरुन नयनतारा पुन्हा एकदा इंडस्ट्री गाजवायला सज्ज झाली.