शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 05:23 PM2023-09-08T17:23:13+5:302023-09-08T17:27:09+5:30
Jawan : ‘जवान’ची छप्परफाड कमाई! पहिल्याच दिवशी जगभरात जमवला १०० कोटींहून अधिक गल्ला
बहुप्रतीक्षित असलेला किंग खानचा ‘जवान’ अखेर गुरुवारी(७ सप्टेंबर) चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. तगडी स्टार कास्ट आणि उत्तम कथा असलेला ‘जवान’ प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरल्याचं चित्र आहे. या चित्रपटाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल होत आहेत. ‘पठाण’नंतर शाहरुखच्या ‘जवान’साठी प्रेक्षक आतुर होते. शाहरुखने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत ‘जवान’मधून बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरातही शाहरुखच्या जवानची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘जवान’चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.
प्रदर्शनाआधीच ‘जवान’ने अॅडव्हान्स बुकिंगमधूनच कोट्यवधींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळणार प्रतिसाद पाहून पहिल्याच दिवशी हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. शाहरुखच्या ‘जवान’ने पहिल्याच दिवशी देशात तब्बल ७५ कोटींची कमाई केली आहे. हिंदीत या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला जमवला. जवान सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत आता पहिल्या स्थानावर आहे.
दारू पाजून प्रसिद्ध अभिनेत्याचा दोन महिलांवर बलात्कार, कोर्टाने सुनावली ३० वर्षांची शिक्षा
देशातच नव्हे तर जगभरातही शाहरुखच्या जवानने छप्परफाड कमाई केली आहे. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १२९.६ कोटींची कमाई केली आहे.
पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा?
प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथी, सुनिल ग्रोव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याबरोबरच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात झळकली आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.