सगळ्या कडवट आठवणी, वाईट गोष्टी.. साऱ्यांना अलविदा...! ‘झिम्मा’चं नवं गाणं आलं!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 12:53 PM2021-11-16T12:53:31+5:302021-11-16T12:54:36+5:30

Jhimma New Song Alvida : मराठी सिनेरसिक एका चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचं नाव आहे ‘झिम्मा’. या चित्रपटाचं नवं गाणं रिलीज झालंय.

Jhimma new song Alvida released, Sonalee Kulkarni share video | सगळ्या कडवट आठवणी, वाईट गोष्टी.. साऱ्यांना अलविदा...! ‘झिम्मा’चं नवं गाणं आलं!!

सगळ्या कडवट आठवणी, वाईट गोष्टी.. साऱ्यांना अलविदा...! ‘झिम्मा’चं नवं गाणं आलं!!

googlenewsNext

मराठी सिनेरसिक एका चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचं नाव आहे ‘झिम्मा’ (Jhimma). होय, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’त तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोल अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाची उत्सकता शिगेला पोहोचली आहे. तूर्तास या चित्रपटाचं नवं गाणं रिलीज झालंय.

काहीच क्षणांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni)‘अलविदा’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला. ‘आयुष्यातल्या सगळ्या कडवट आठवणी, घडून गेलेल्या वाईट गोष्टी.. सा-यांना अलविदा! आता आनंद आणि आयुष्याचा सोहळा..सादर आहे आमच्या मनाच्या जवळचं गाणं.. अलविदा..., ’अशा आशयाचं कॅप्शन हे गाणं शेअर करताना तिने दिलं आहे. हर्षवर्धन वावरेच्या आवाजातील या गाण्याला अमितराज यांचे संगीत आहेत.

महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये 19नोव्हेंबरला ‘झिम्मा’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपटाचा विषय वेगळ्या धाटणीचा आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमी, आवडीनिवडी, वयोगट असलेल्या अनोळखी स्त्रिया जेव्हा सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा होणारी धमाल म्हणजे‘झिम्मा’. या वेगळ्या स्वभावाच्या महिला प्रवाशांची जेव्हा  इंग्लंड टूर  सुरु होते तेव्हा त्यांच्यात घडणारी मज्जामस्ती, खटके, एकमेकींविषयीची काळजी, वेळोवेळी दिलेले मानसिक धैर्य, नव्याने निर्माण झालेली नाती असा सुंदर प्रवास ‘झिम्मा’मध्ये पाहायला मिळणार आहे

Web Title: Jhimma new song Alvida released, Sonalee Kulkarni share video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.