तो नेहमीच...; ‘झुंड’ पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या रिअॅक्शनवर अमिताभ यांनी अशी दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 03:08 PM2022-03-10T15:08:15+5:302022-03-10T15:08:59+5:30
jhund; Amitabh Bachchan on Aamir Khan: काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘झुंड’ हा चित्रपट पाहिला आणि त्याचे डोळे पाणावले. आमिर ‘झुंड’चं भरभरू कौतुक करताना दिसला. आमिरच्या या रिअॅक्शनवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ (jhund)हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाचं प्रचंड कौतुक होतंय. अगदी बॉलिवूडपासून मराठी चित्रपटसृष्टीपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) हा चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे डोळे पाणावले. टी सीरिजनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आमिर ‘झुंड’चं भरभरू कौतुक करताना दिसला. माझ्याकडे या सिनेमाचं कौतुक करायला शब्दचं नाहीत, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. आमिरच्या या रिअॅक्शनवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अमिताभ...?
‘झुंड’ पाहून आमिरचे डोळे पाणावले, याबद्दल काय म्हणाल? असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत अमिताभ यांना विचारण्यात आला. यावर ‘आमिर हा नेहमी ओव्हर एक्सायटेड होतो. पण तो एक चांगला परिक्षक आहे. मी त्यानं केलेल्या कौतुकाबद्दल त्याचे आभार मानतो,’ असं अमिताभ म्हणाले.
काय म्हणाला होता आमिर?
आमिर खानसाठी ‘झुंड’चं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला नागराज मंजुळे, टी सीरिजचे भूषण कुमार आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. चित्रपट संपला आणि स्क्रिनिंगला उपस्थित सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला होते. ‘ चित्रपट पाहून मी नि:शब्द झालोय. माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही भारतीय मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवलंय, ते मी शब्दांत सांगू शकत नाही. मुलांनी काय काम केलंय. चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं ते कमी आहे. या चित्रपटाने मला आश्चर्यचकीत करून सोडलं आहे. जे आम्ही गेल्या 20-30 वर्षांत करू शकलो नाही, ते नागराजनं या एका चित्रपटातून करून दाखवलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी हा एक आहे,’ अशा शब्दांत आमिरने ‘झुंड’चं कौतुक केलं होतं.