"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:54 PM2024-10-21T16:54:18+5:302024-10-21T17:26:51+5:30

'थपकी प्यार की' या शोच्या दुसऱ्या सीझनमध्येही ही अभिनेत्री दिसली होती. पण तब्येतीच्या कारणामुळे तिने २०२२ मध्येच शो सोडला.

जिज्ञासा सिंह ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. 'थपकी प्यार की' या मालिकेतून तिला घराघरात ओळख मिळाली.

'थपकी प्यार की' या शोच्या दुसऱ्या सीझनमध्येही ही अभिनेत्री दिसली होती. पण तब्येतीच्या कारणामुळे तिने २०२२ मध्येच शो सोडला.

त्यानंतर ही अभिनेत्री कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. अशा परिस्थितीत तिने इंडस्ट्री सोडल्याचं अनेकांना वाटत आहे.

आता खुद्द जिज्ञासानेच याबाबत खुलासा केला आहे. ETimes शी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, "मी २०१३ पासून सतत काम करत आहे."

"अशा स्थितीत भावनिक आणि शारीरिक चढ-उतार होणं स्वाभाविक आहे. माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून मी स्वतःला खूप पूश केलं, त्यामुळे माझी तब्येत आणखी बिघडली."

"मला 'थपकी 2' मधून माघार घ्यावी लागली. मला ते पात्र खूप आवडलं. हा माझा चॉईस नव्हता, पण माझ्या तब्येतीसाठी मला ते करावं लागलं."

"कामावर परत येण्यापूर्वी मला बरं होण्यासाठी वेळ हवा होता. कामातून ब्रेक घेणं हा योग्य निर्णय होता. पण इतका वेळ लागेल असं मला वाटलं नव्हतं."

"आता मी जिथे जिथे ऑडिशनसाठी जाते तिथे लोक मला विचारतात की मी वेब शोसाठी टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे का? जे खरं नाही."

"मी हे स्पष्ट करू इच्छिते की, मी टीव्ही इंडस्ट्री सोडलेली नाही. मी आता पूर्णपणे ठीक आहे आणि मला लवकरच टीव्हीवर परतायचं आहे."

"टीव्ही इंडस्ट्रीने मला खूप काही दिले आहे. मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे" असं देखील अभिनेत्रीने म्हटलं आहे.