जितेंद्र जोशीच्या लग्नाला झाली १२ वर्षे, त्याच्या पत्नीचा आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 06:17 PM2021-09-01T18:17:52+5:302021-09-01T18:18:24+5:30
जितेंद्र जोशीच्या लग्नाला नुकतेच १२ वर्षे पूर्ण झाले आहेत.
चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची आव्हानात्मक भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो.
जितेंद्र जोशी सोशल मीडियावर सक्रीय आहे. या माध्यमातून तो आपले मित्र आणि चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. जितेंद्र जोशीच्या लग्नाला नुकतेच १२ वर्षे पूर्ण झाले. त्याने त्याच्या पत्नीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करीत १२व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता जितेंद्र जोशीच्या पत्नीचे नाव मिताली जोशी असून ती गृहिणी आहे. मिताली चित्रपट व नाटकांचे लेखन करते आणि तिने नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. मिताली आणि जितेंद्र यांना एक मुलगी आहे जिचे नाव रेवा आहे.
जितेंद्र जोशीची कार्टेल ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय तो एका हिंदी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्यात अर्शद वारसी आणि जुही चावला मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
याशिवाय तो एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवायही एका चित्रपटाची तयारीदेखील सुरू आहे.