जमाई राजात इंद्रनीलची एन्ट्री!

By Admin | Published: May 7, 2016 04:31 AM2016-05-07T04:31:01+5:302016-05-07T04:31:01+5:30

‘झी टीव्ही’वरील ‘जमाई राजा’ या लोकप्रिय मालिकेतील नवे बदल प्रेक्षकांना एकापाठोपाठ एक असे धक्के देणारे ठरताहेत. मग तो डीडीचा (अचिंत कौर) आकस्मिक मृत्यू असो

Jodai Rajatar Indraneel's entry! | जमाई राजात इंद्रनीलची एन्ट्री!

जमाई राजात इंद्रनीलची एन्ट्री!

googlenewsNext

‘झी टीव्ही’वरील ‘जमाई राजा’ या लोकप्रिय मालिकेतील नवे बदल प्रेक्षकांना एकापाठोपाठ एक असे धक्के देणारे ठरताहेत. मग तो डीडीचा (अचिंत कौर) आकस्मिक मृत्यू असो वा मालिकेतील सर्वाधिक आवडते जोडपे सिड (रवी दुबे) व रोशनी (निया शर्मा) यांचे अनपेक्षितपणे विभक्त होणे असो. आता मालिकेने दोन वर्षांचा लीप घेतला आहे. यानंतर मालिकेत देव सेनगुप्ता (इंद्रनील सेनगुप्ता) या यशस्वी व धनाढ्य उद्योगपतीची एन्ट्री होत आहे. गेले अनेक महिने चित्रपटांमध्ये बिझी असल्याने इंद्रनीलला छोट्या पडद्यासाठी वेळ मिळाला नव्हता. पण आता तो जमाई राजात पूर्ण लांबीची भूमिका साकारत आहे. हा अबोल व दानशूर उद्योगपती हळूहळू रोशनीत गुंतत जातो. त्याला सिड व रोशनीच्या कडवट नात्याबद्दल काहीच कल्पना नसते. त्यामुळे रोशनीबद्दल त्याला आकर्षण वाटू लागतं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर असतं, ज्याची देवलाही कल्पना नसते, अशा वळणाने मालिका जाणार आहे. इंद्रनील या भूमिकेसाठी अतिशय उत्साही आहे. आता या महत्त्वाच्या टप्प्यावर सिड-रोशनी परत एकमेकांविरोधात वागतील का, रोशनी सिडला माफ करील की देवला साथ देईल... हे जाणून घेण्यासाठी जमाई राजा बघायला हवी.

Web Title: Jodai Rajatar Indraneel's entry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.