सोफी टर्नरने घटस्फोटापूर्वी केलं दुसऱ्या पुरुषाला KISS, जो जोनासनं सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:42 PM2023-11-07T12:42:58+5:302023-11-07T12:45:18+5:30
कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.
हॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे जो जोनास आणि सोफी टर्नर यांनी दोन महिन्यांपूर्वी वेगळे होण्याची घोषणा केली होती. कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. त्याच दरम्यान सोफीच्या किसिंगच्या फोटोंनी खळबळ उडवून दिली. ती सार्वजनिकरित्या पेरेग्रीन पियर्सनला किस करताना दिसली होती. यावर आता जो जोनासने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.
झाले की काही दिवसांपूर्वी सोफी टर्नरला सार्वजनिक ठिकाणी पेरेग्रीन पिअरसनला किस्सा करताना दिसली होती. सोफी आणि पिअर्सनचा किस करतानाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता.
घटस्फोटापूर्वीच सोफी टर्नरच्या दुस-या पुरुषासोबत केलेल्या Kissमुळे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. आता डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जो जोनासने आपल्या एक्स पत्नीच्या किसवर मौन सोडले आहे. रिपोर्टनुसार, जो जोनास म्हणतो की, सोफीने सार्वजनिकरित्या दुसऱ्याला किस करणे खूप घाईचे आहे. जोचा असा विश्वास आहे की सोफीवर त्याचा कोणत्याचा आधिकार नाही. जो जोनास आपल्या आयुष्यात पुढे निघून गेला आहे. तो फक्त मुलींच्या संगोपनावर भर देतोय.
जो जोनस त्यांच्या भावांसोबत ट्रिपमध्ये व्यस्त आहे. तो सोफीपासून घटस्फोट घेऊन आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. सोफी टर्नर आणि जो जोनास यांचा घटस्फोट होत आहे त्याच दिवशी सोफी पार्टी करताना दिसली. तेव्हापासून ती सतत चर्चेत असते.