जॉन अब्राहमने मारला ‘भाईजान’ला टोमणा! ‘रेस 3’ची अशी उडवली खिल्ली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 06:00 AM2019-01-08T06:00:00+5:302019-01-08T06:00:06+5:30
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बटला हाऊस’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. खरे तर जॉन कुणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण अलीकडे एका ताज्या मुलाखतीत मात्र जॉनने थेट भाईजान सलमान खानवर निशाणा साधला.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बटला हाऊस’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. खरे तर जॉन कुणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण अलीकडे एका ताज्या मुलाखतीत मात्र जॉनने थेट भाईजान सलमान खानवर निशाणा साधला.
होय, यामुलाखतीत जॉन इंडस्ट्रीतील अनेक मुद्यांवर बोलला. सोशल मीडियावरचे ट्रोलिंग, हायेस्ट पेड अॅक्टर्स अशा अनेक विषयांवर त्याने परखड मत मांडले. पण हे मत मांडताना जॉन अचानक ‘भाईजान’वर घसरला. हायेस्ट पेड लिस्टमध्ये सामील होण्यासाठी कलाकार इतका आटापिटा का करतात, हे मला कळत नाही, असे जॉन यावेळी म्हणाला.
आपण कलाकार आहोत आणि काम हीच कलाकाराची ओळख आहे, असे सांगत असताना जॉनने सलमानचे उदाहरण दिले. असे अनेक स्टार्स आहेत, जे सलग तीन वर्षांपासून हायेस्ट पेड स्टार्सच्या लिस्टमध्ये सामील आहेत. पण त्यांचे चित्रपट फ्लॉप आहेत. गतवर्षीचीचं हायेस्ट पेड लिस्ट पाहा, या लिस्टमध्ये सलमान खान टॉपवर आहे. पण त्याचा ‘रेस 3’ दणकून आपटला, असे जॉन म्हणाला. आता जॉन अचानक भाईजानवर का घसरला,हे माहित नाही. पण त्याने ‘रेस 3’चे उदाहरण देऊन भाईजानला डिवचले, इतके मात्र नक्की.
या मुलाखतीत जॉनने सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगवरही मत मांडले. अनेक स्टार्स एअरपोर्टवर मजेशीर पोशाख घालून दिसतात आणि मग सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर गळा काढतात. तुम्ही किती मोठे स्टार आहात, हेही आजकाल सोशल मीडियावरून ठरवले जाते, असेही जॉन म्हणाला.
पैशांसाठी लग्नात नाचणाºया बॉलिवूड स्टार्सलाही जॉनने डिवचले. मी कधीच पैशांसाठी लग्नात नाचू शकत नाही. असे करणे चुकीचे आहे, असे मी म्हणणार नाही. हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. पण मी कधीच असे करू शकणार नाही, असे जॉन म्हणाला.