‘ढंग का पोस्टर तो बना लेते...’; ‘सत्यमेव जयते 2’चे पोस्टर रिलीज होताच ट्रोल झाला जॉन अब्राहम
By रूपाली मुधोळकर | Published: September 22, 2020 04:01 PM2020-09-22T16:01:54+5:302020-09-22T16:02:19+5:30
‘सत्यमेव जयते’ या सिनेमाच्या यशानंतर जॉनचा ‘सत्यमेव जयते 2’ प्रेक्षकांच्या भेटीय येणार आहे.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. आता ‘सत्यमेव जयते’ या सिनेमाच्या यशानंतर जॉनचा ‘सत्यमेव जयते 2’ प्रेक्षकांच्या भेटीय येणार आहे. नुकतेच जॉनने या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. पण हे काय? हे पोस्टर पाहून नेटक-यांनी जॉनला ट्रोल करणे सुरु केले.
‘जिस देश की मैया गंगा है, वहाँ खून भी तिरंगा है’ असे जॉनने या पोस्टरची टॅग लाईन आहे. या पोस्टरमध्ये जॉनच्या अंगातून रक्त येताना दाखवले आहे. मात्र या रक्ताचा रंग लाल नाही तर रक्ताच्या जागी तिरंग्याचे रंग
त्यात दाखवले आहेत. यात भगवा रंग खाली आणि हिरवा रंग वर दाखवला गेला आहे. नेटक-यांना नेमकी हीच गोष्ट खटकली आणि ते भडकले. यामुळे त्यांनी जॉन अब्राहमला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
तिरंग्यामध्ये भगवा रंग सर्वात वर आहे आणि हिरवा रंग सर्वांत खाली आहे, याकडे नेटक-यांनी जॉनचे लक्ष वेधले. ही चूक लवकरात लवकर सुधारण्याची मागणीही नेटक-यांनी केली.
‘ढंग का पोस्टर तो बना लेते,’ असे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरनेही हे पोस्टर पाहून जॉनची मजा घेतली. ‘भैयाजी तिरंगा उल्टा बना दिए सारा... जलदबाजी में थे लगता है,’ असे या युजरने लिहिले. ‘सब ठीक हैं भाई मगर हरा, सफेद खून कब से आने लगा शरीर से. तिरंगा ठीक है, मगर पोस्टर की तो इज्जत करो. कितना बकवास एडिटींग लग रहीं है,’ असे एका युजरने जॉनला सुनावले.
‘सत्यमेव जयते 2’ हा सिनेमा मिलाफ झवेरी यांनी दिग्दर्शित केला आहे. यात जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे. अभिनेत्री दिव्या खोसला कुमार या सिनेमात जॉनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
‘सत्यमेव जयते’मध्ये जॉन भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसला होता. पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरुद्ध जॉन अब्राहमने त्या चित्रपटात आवाज उठवला होता.
जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते २' येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला, त्यानेच दिली ही खुशखबरी
‘सत्यमेव जयते 2’मध्ये तो राजकीय नेते, उद्योगपतीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसेल. हा सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. दिग्दर्शक मिलापने चित्रपटाच्या कथेत बरेच बदल केले आहेत. त्याने सांगितले की, कथा लखनौच्या अवतीभवती फिरते. या सिनेमात पहिल्या भागापेक्षा जास्त अॅक्शन सीक्वन्स पाहायला मिळणार आहेत.
2018 मध्ये मिलाप व जॉनने ‘सत्यमेव जयते’ बनवला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हिट ठरला होता़ यात जॉनच्या अपोझिट आयशा शर्मा झळकली होती.