John Abraham : 'पठाण' वाद: आता जॉनच्या टॅटूची चर्चा, एका गायकासाठी विद्यार्थ्यानं झाडली होती शिक्षकावर गोळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:02 AM2022-12-19T11:02:11+5:302022-12-19T11:03:00+5:30

John Abraham, Pathaan : 'पठाण'च्या पोस्टरमध्ये जॉन अब्राहमच्या हातावरील टॅटू मागची रोचक कहाणी...

john abraham in pathaan has line written on hand by marilyn manson | John Abraham : 'पठाण' वाद: आता जॉनच्या टॅटूची चर्चा, एका गायकासाठी विद्यार्थ्यानं झाडली होती शिक्षकावर गोळी!

John Abraham : 'पठाण' वाद: आता जॉनच्या टॅटूची चर्चा, एका गायकासाठी विद्यार्थ्यानं झाडली होती शिक्षकावर गोळी!

googlenewsNext

शाहरूख खान (Shah Rukh Khan) व दीपिका पादुकोणच्या ‘पठाण’ची (Pathaan) सध्या जोरदार चर्चा आहे. ‘पठाण’चं पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ रिलीज होताच, या सिनेमानं वाद ओढवून घेतला. दीपिकाचा या गाण्यातील बोल्ड लुक आणि तिने घातलेल्या बिकिनीचीही जोरदार चर्चा झाली. पण या सगळ्यात ‘पठाण’मधील एक महत्त्वाचं कॅरेक्टर मात्र काहीसं दुर्लक्षित झालं. होय, आम्ही बोलतोय ते जॉन अब्राहमबद्दल (John Abraham). जॉन या चित्रपटात निगेटीव्ह रोलमध्ये आहे. पण त्याच्याकडे लोकांचं फार लक्ष गेलेलं नाही. 

जॉनचा ‘पठाण’मधील फर्स्ट लुक समोर आला तेव्हाच, त्याचा रोल चांगलाच ‘खतरनाक’ असल्याचं स्पष्ट झालं होतं. शनिवारी जॉनच्या वाढदिवशी शाहरूखने त्याचा नवा लुक शेअर केला. यात त्याच्या कॅरेक्टरची इंटेन्सिटी आणखीच ‘खतरनाक’ दिसतेय. या लुकमध्ये जॉनच्या हातावर लिहिलेल्या ओळींकडे कदाचित तुमचंही लक्ष गेलं नसावं. पण सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. जॉनच्या हातावरच्या या ओळी आणि त्याचं सिनेमातील कॅरेक्टर यांचं कनेक्शन खूप इंटरेस्टिंग  आहे.

जॉनच्या हातावर असं लिहिलंय तरी काय?
शाहरूखने जॉनचा नवा लुक शेअर केला आहे. यात जॉन ब्लॅक लेदर जॅकेट व कार्गोमध्ये दिसतोय. त्याच्या एका हातात गन आहे आणि Everyone will come to my funeral to make sure that I stay dead  अशा ओळी त्याच्या हातावर लिहिलेल्या आहे. ‘मी जिंवत आहे की नाही, हे बघण्यासाठी माझ्या अंत्यसंस्काराला प्रत्येकजण येईल...,’असा या ओळींचा अर्थ होतो. या ओळी वाचून जॉनचं ‘पठाण’मधील कॅरेक्टर किती भयंकर असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच.

काय आहे कनेक्शन...
जॉनच्या हातावर लिहिलेल्या या लाइन ‘फोर रस्टेड हॉर्सेज’ या गाजलेल्या इंग्लिश गाण्यात येतात. हे गाणं लोकप्रिय अमेरिकन सिंगर मर्लिन मैन्सनने (Marilyn Manson) गायलं आहे. मर्लिन मैन्सन एका बँडचा लीड सिंगर आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या या बँडच्या The High End OF Low या अल्बममध्ये हे गाणं होतं. ‘फोर रस्टेड हॉर्सेज’ हे गाणं जितकं लोकप्रिय झालं तितकीच त्याच्यावर टीकाही झाली. मैन्सन जितका लोकप्रिय आहे, तितकाच त्याच्यावर नकारात्मकता पसरवण्याचा आरोप होतो.   

कोण आहे मर्लिन मैन्सन
1999 मध्ये अमेरिकेच्या कोलोराडो येथे एका हायस्कूलच्या एरिक हॅरिस व डिलन क्लेबोल्ड या दोन सीनिअर्सनी शाळेतील 12 विद्यार्थी व एका शिक्षकाची हत्या केली होती. अन्य 24 जणांना जखमी केलं होतं. या हत्याकांडानंतर दोन्ही सीनिअर्सनी आत्महत्या केली होती. या हत्याकांडानंतर मर्लिन मैन्सनवर वेगवेगळे आरोप झाले होते. त्याला मारेकरूंना प्रेरणा देणारा शैतानांचा पुजारी म्हटलं गेलं होतं. अर्थात मर्लिन मैन्सनवरचे अनेक आरोप खोटे सिद्ध झाले होते. 2000 साली इटलीत तीन शालेय मुलींनी एक म्हाताऱ्या ननची हत्या केली होती. या तिन्ही आरोपी मुलींच्या डायरीमध्ये मर्लिन मैन्सनबद्दल अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या. त्याचे फोटो त्यांच्या डायरीत सापडले होते.

2003 साली फ्रान्समध्ये काही मुलांनी ब्रिटीश वॉर हिरोजच्या थडग्यांची तोडफोड केली. तेव्हा फे्रंच मीडियाने सुद्धा मैन्सनवर आरोप केले होते. त्याचवर्षी स्कॉटलंडमध्ये  14 वर्षांच्या मुलीची हत्या झाली. तिचा मृतदेह भयंकर अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिचा बॉयफ्रेन्ड ल्युक मिशेलला अटक केली होती. त्याच्या घरातून पोलिसांना मैन्सनच्या ‘द गोल्डन एज ऑफ ग्रोटेस्क’ची एक कॉपी सापडली होती. ल्युकने हत्या केली त्याचदिवशी ती अल्बमची कॉपी खरेदी केली होती. या अल्बममध्ये मर्लिन मैन्सनची एक पेंटिग होती. यात त्याने एका पूर्णपणे छिन्नविछिन्न डेड बॉडीचं चित्र रेखाटलं होतं. याच कारणामुळे सिंगर मर्लिन मैन्सन याच्यावर निगेटीव्ही पसरवण्याचे आरोप होत आले आहेत.

Web Title: john abraham in pathaan has line written on hand by marilyn manson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.