जॉन अब्राहम पुन्हा जखमी, घ्यावी लागणार तीन आठवड्यांची विश्रांती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:20 PM2019-05-24T12:20:47+5:302019-05-24T12:21:31+5:30

होय, ‘पागलपंती’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जॉन अब्राहम जखमी झाला. यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

John Abraham injured again, rest for three weeks |   जॉन अब्राहम पुन्हा जखमी, घ्यावी लागणार तीन आठवड्यांची विश्रांती 

  जॉन अब्राहम पुन्हा जखमी, घ्यावी लागणार तीन आठवड्यांची विश्रांती 

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बाटला हाऊस’च्या शूटींगदरम्यानही जॉनला दुखापत झाली होती.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम चित्रपटातील स्वत:चे अ‍ॅक्शन सीन्स स्वत: करतो. म्हणजेच, तो यासाठी बॉडी डबल वापरत नाही. धोकादायक स्टंट करताना अनेकदा जॉन जोखिम पत्करतो. याचमुळे शूटींग करताना तो अनेकदा जखमी झाला आहे. ताजी बातमीही तीच. होय, ‘पागलपंती’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जॉन अब्राहम जखमी झाला.   यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तीन आठवडे जॉन या चित्रपटाचे शूटींग करू शकणार नाही.


चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, हा एक सिंपल शॉट होता. पण जॉनचे टायमिंग चुकले आणि तो जखमी झाला. या अपघातात जॉनच्या मसल्सला दुखापत झाली. दुखापतीनंतर जॉनला लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला.


‘पागलपंती’ चे ९० टक्के शूटींग पूर्ण झाले आहे. तूर्तास मुंबईत याच्या शेवटच्या शेड्यूलचे शूटींग सुरु होते. पण जॉनच्या दुखापतीमुळे हे शेड्यूल आता लांबणीवर पडले आहे. ‘पागलपंती’  हा एक कॉमेडी चित्रपट आहेत. जॉनशिवाय अनिल कपूर, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, इलियाना डिक्रूज, कृती खरबंदा यात मुख्य भूमिकेत आहेत. ‘पागलपंती’ रिलीज होण्याआधी या चित्रपटाच्या सीक्वलचेही काम सुरु  झाले आहे.
जॉन अब्राहम याआधी ‘रोमिओ, वॉल्टर अकबर’ या चित्रपटात दिसला होता. त्यापूर्वी ‘बाटला हाऊस’, ‘सत्यमेव जयते’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित झाले होते. ‘बाटला हाऊस’च्या शूटींगदरम्यानही जॉनला दुखापत झाली होती.

Web Title: John Abraham injured again, rest for three weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.