जॉनच्या आई-वडिलांवर आली रिक्षाने प्रवास करायाची वेळ; कारण वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 02:16 PM2021-09-22T14:16:08+5:302021-09-22T14:16:54+5:30
John abraham: प्रसिद्धीझोतात असलेल्या जॉनकडे आज असंख्य गाड्या आहेत. मात्र, तरीदेखील त्याचे आई-वडील रिक्षा किंवा बसने प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.
बॉलिवूडमधील हॉट, हँडसम आणि डॅशिंग अभिनेता अशी ओळख असलेल्या जॉन अब्राहमने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. गेल्या १२ वर्षांपासून कलाविश्वात सक्रीय असलेल्या जॉनचं त्याच्या अभिनयावर जितकं प्रेम आहे, त्याच्यापेक्षा कैकपटीने तो त्याच्या कुटुंबावर प्रेम करतो. आपल्या आई-वडिलांवर असलेलं त्याचं हे प्रेम अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिसून येतं. जॉन बऱ्याचदा त्याच्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. प्रसिद्धीझोतात असलेल्या जॉनकडे आज असंख्य गाड्या आहेत. मात्र, तरीदेखील त्याचे आई-वडील रिक्षा किंवा बसने प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.
अनेकदा सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या कुटुंबीयांचे फोटो व्हायरल होत असतात. यावेळी सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांचा थाट पाहायला मिळतो. मात्र, या सगळ्यामध्ये जॉनचे आई-वडील अत्यंत वेगळे आहेत. विशेष म्हणजे आपला मुलगा एक मोठा कलाकार असल्याचा त्यांना अजिबात गर्व नाही. त्यामुळे अजूनही ते रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. एका मुलाखतीत जॉनने स्वत: याविषयीचा खुलासा केला होता.
"माझे आई-वडील खूप छान आहेत. अजूनही मी आणि वडील एकत्र बसून फूटबॉलची मॅच पाहतो. परंतु, मला एकदा तरी त्यांना युरोपमध्ये नेऊन लाइव्ह फूटबॉल मॅच दाखवायची आहे", असं जॉन म्हणाला.
राजमहालापेक्षा कमी नाही बिग बींचा 'जलसा'; पाहा घराचे Inside Photo
पुढे तो म्हणतो, "माझे आई-वडील अत्यंत साधे आहेत. त्यामुळे अजूनही त्यांची जमिनीशी जोडलेलं नाळ कायम आहे. ते अजून सुद्धा रिक्षा किंवा बस अशा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात."
Video : असं असतं ऐश्वर्या नारकरचं फोटोशूट; पाहा 'बिहाइंड द सीन'
दरम्यान, जॉनची आई पारसी असून वडील मल्याळी आहेत. त्यामुळेच लहानपणी जॉनचं नाव ठेवतानाही त्यांनी दोन्ही धर्मांचा विचार केला होता, असं म्हटलं जातं. जॉनचं खरं नाव फरहान आहे. मात्र, कलाविश्वात येण्यापूर्वी त्याने हे नाव बदललं.