शाहरूख खानच्या 'पठान'साठी जॉन अब्राहम घेतोय इतके कोटी मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क
By तेजल गावडे | Published: November 5, 2020 05:36 PM2020-11-05T17:36:26+5:302020-11-05T17:36:58+5:30
अभिनेता जॉन अब्राहम यशराज प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'पठान'मध्ये दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यशराज प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'पठान'मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ आनंदचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदा या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने घेतलेल्या मानधनाबद्दल काही बातम्या समोर आल्या आहेत. असे म्हटले जात आहे की या चित्रपटासाठी जॉनने २० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
जॉन अब्राहमने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता त्याला असा कलाकार समजले जाते जो स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर चित्रपट हिट करू शकतो. असे म्हटले जात आहे की त्यामुळे यशराज बॅनरने या चित्रपटासाठी जॉनचे मानधन वाढविले आहे. साधारण जॉन एका सिनेमासाठी ५ ते ७ कोटी रुपये घेतो. पण या चित्रपटासाठी त्याला २० कोटी रुपये मानधन दिले जात आहे. या चित्रपटात तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. त्याचे शूटिंग एकूण ६० दिवसांचे असणार आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सध्या जॉन अब्राहम खूप व्यग्र आहे. पुढील वर्षी जानेवारीच्या अखेरीस तो पठाणच्या शूटिंग सुरूवात करण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील इतर कलाका नोव्हेंबरमध्ये शूटिंग करणार आहेत. जॉन अब्राहम जानेवारी महिन्यात कलाकारांसोबत परदेशात जाऊ शकतो. सूत्रांचे म्हणणे आहे की, हा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्शन चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे पठाण चित्रपट २०२१च्या दिवाळीवर रिलीज करण्याची योजना आखली जात आहे.
जॉन अब्राहमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर जॉनकडे सध्या चित्रपटाच्या रांगा लागल्या आहेत. तो मोहित सूरीच्या एक व्हिलन २मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट जानेवारी २०२१ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो सत्यमेव जयते २ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिव्या कुमार खोसला दिसणार आहे. सध्या तो मुंबई सागा आणि अटॅकच्या तयारीत बिझी आहे.