का लाईमलाईटपासून दूर राहते जॉन अब्राहमची पत्नी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 03:27 PM2019-03-17T15:27:28+5:302019-03-17T15:28:45+5:30
आपल्या रिअल लाईफबद्दल बोलणे जॉन अब्राहमला अजिबात आवडत नाही. त्याची पत्नी प्रिया ही सुद्धा लाईमलाईटपासून दूर राहते. अलीकडे एका मुलाखतीत जॉनने यामागचे कारण सांगितले.
जॉन अब्राहम बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. जॉनचा ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’ अर्थात ‘रॉ’ हा चित्रपट लवकरच पे्रक्षकांच्या भेटीस येतोय. जॉन आपल्या रिल लाईफबद्दल भरभरून बोलतो. पण आपल्या रिअल लाईफबद्दल बोलणे मात्र त्याला अजिबात आवडत नाही. त्याची पत्नी प्रिया ही सुद्धा लाईमलाईटपासून दूर राहते. अलीकडे एका मुलाखतीत जॉनने यामागचे कारण सांगितले.
‘मला पापाराझी कल्चर अजिबात आवडत नाही. विशेषत: मी पत्नीसोबत क्वालिट टाईम घालवत असताना, मला ते अजिबात आवडत नाही. मी प्रायव्हेट पर्सन आहे आणि माझी पत्नी प्रिया ही माझ्यापेक्षाही प्रायव्हेट पर्सन आहे. तिची हीच गोष्ट मला सर्वाधिक आवडते. प्रिया सतत कामात बिझी असते. पण पडद्यामागे. सध्या ती माझी फुटबॉल टीम सांभाळतेय. एका टीमला हाताळणे कुठल्या प्रॉडक्शन टीमला हाताळण्यासारखे आहे,’असे त्याने सांगितले.
जॉन आणि प्रिया २०१४ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले. प्रियाचा जन्म अमेरिकेत झाला असून, ती एक इन्व्हेस्टमेंट बॅँकर आहे. प्रियासोबत लग्न करण्याअगोदर जॉनचे अभिनेत्री बिपाशा बसू हिच्याशी अफेयर होते. दोघे लग्न करतील असे बोलले जात होते. परंतु काही कारणास्तव त्यांच्यात ब्रेकअप झाले.
जॉनचा आगामी चित्रपट ‘रॉ’ हा चित्रपट एका ख-या भारतीय गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित आहे. पाकिस्तानच्या सैन्यात सामील होऊन या गुप्तहेराने भारतीय सैन्यासाठी काम केले होते. रॉबी गरेवाल यांनी ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’ (रॉ) या चित्रपटाची पटकथा लिहिली. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यापूर्वी त्यांनी व्हेन टाइम स्ट्राइक्स , एम पी3: मेरा पहला पहला प्यार आणि आलू चाट सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.ह्यरोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)ह्ण हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला रिलीज होतोय. आधी या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतचे नाव फायनल झाले होते. त्याच्यासोबतचे चित्रपटाचे पहिले पोस्टरही लॉन्च झाले होते. पण नंतर डेट्सच्या अडचणीमुळे ऐनवेळी सुशांतने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि हा चित्रपट जॉनच्या झोळीत पडला.