जॉन अब्राहम साकारणार 'ह्या' पोलीस अधिकाऱ्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 12:03 PM2018-09-22T12:03:28+5:302018-09-22T12:09:58+5:30
'बाटला हाऊस' चित्रपटाची कथा भारतातील वादग्रस्त पोलीस अधिकारीवर आधारीत आहे.
अभिनेता जॉन अब्राहमचा काही महिन्यांपूर्वी 'परमाणू' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता त्याचा 'बाटला हाऊस' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने नुकतेच या चित्रपटातील त्याचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. 15 ऑगस्ट, 2019 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजीव कुमार यादव या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत जॉन दिसणार आहे. संजीव कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली 2008 साली बाटला हाऊस एनकाउंटर केले होते.
'बाटला हाऊस' चित्रपटाची कथा भारतातील वादग्रस्त पोलीस अधिकारीवर आधारीत आहे. जॉनने या चित्रपटाचा पोस्टर शेअर करून लिहिले की, 95 मिनिटांची गोष्टीचा सुगावा लावण्यासाठी ज्याला आठ वर्षे लागले. या पोस्टरसह जॉनने आणखीन दोन पोस्टर शेअर केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल आडवाणी यांच्या मते संजीव कुमार यादवच्या भूमिकेसाठी अभिनेता जॉन अब्राहम अगदी योग्य आहे. त्याची पर्सनॅलिटी या रोलसाठी परफेक्ट आहे.
“95 mins that took 8yrs to be resolved and changed his life forever.” The story of India’s most Decorated/Controversial Cop. #BatlaHouse@itsBhushanKumar@nikkhiladvani@writish@TSeries@EmmayEntertain@johnabrahament@bakemycakefilms@BatlaHouseFilmpic.twitter.com/RzsbCT5kcd
— John Abraham (@TheJohnAbraham) September 22, 2018
13 सप्टेंबर 2008 साली दिल्लीतील करोल बाग, कनाट प्लेस, इंडिया गेट व ग्रेटर कैलाश येथे एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले होते. या दुर्घटनेत 26 लोक मृत्यूमुखी पडले होते व 133 लोक जखमी झाले होते. दिल्ली पोलिसांनी या बॉम्बस्फोटोसाठी दहशतवादी संघटना इंडियान मुजाहिद्दीनला जबाबदार धरले होते. या घटनेच्या सहा दिवसानंतर 19 सप्टेंबरला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची सूचना मिळाली होती की इंडियन मुजाहिद्दीन संघटनेटे पाच आंतकवादी बाटला हाऊसमधील एका घरात राहत आहेत. 'बाटला हाऊस' चित्रपट 15 ऑगस्ट, 2019ला प्रदर्शित होणार आहे.