‘बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास सुंदर होता’

By Admin | Published: November 18, 2016 04:52 AM2016-11-18T04:52:50+5:302016-11-18T04:52:50+5:30

आपल्या संगीताने संपूर्ण देशाला वेड लावणारे ‘डिस्को किंग’ अर्थात, सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी

'The journey from Bollywood to Hollywood was beautiful' | ‘बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास सुंदर होता’

‘बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास सुंदर होता’

googlenewsNext

बॉलिवूडला ‘रॉक’ आणि ‘डिस्को डान्स’ची ओळख करून देणारे आणि आपल्या संगीताने संपूर्ण देशाला वेड लावणारे ‘डिस्को किंग’ अर्थात, सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांची क्रेझ अद्यापही संपलेली नाही. बंबई से आया मेरा दोस्त, आयएम अ डिस्को डान्सर पासून ते ऊ ला..ला ऊ लालापर्यंत बप्पींचे गीत आजही लोकांच्या ओठांवर आहेत. आता बप्पी दा मोआनाया अ‍ॅनिमेटेड हॉलिवूडपटाच्या माध्यमातून डिज्नी वर्ल्डपणे पाऊल ठेवत आहे. यासंदर्भात त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...
बप्पी दा मोआना या हॉलिवूडपटाबद्दल काय सांगाल?
- ‘मोआना’ एक अ‍ॅनिमेटेड हॉलिवूडपट आहे. यात मी शोना हे गाणे गायले आहे. शिवाय, यातील टमाटोआ या कॅरेक्टरलाही मी आवाज (व्हाइस ओवर) दिला आहे. माटोआ एक महाकाय खेकडा आहे. मी प्रथमच एका अ‍ॅनिमेटेड हॉलिवूडपटासाठी काम केले आहे. मी याबद्दल अतिशय उत्सुक आहे. लवकरच माझा वाढदिवस येणार आहे. माझ्यामते, मोआनाच्या रूपात मला माझ्या वाढदिवसाची भेट मिळाली आहे.
‘मोआना’चा एकूण अनुभव कसा राहिला?
अतिशय सुंदर. डिज्नी टीमने मला या चित्रपटाबद्दल सांगितले आणि मला यातील टमाटोआ हे कॅरेक्टर अतिशय आवडले. मग काय, मी डिज्नीचा प्रस्ताव मान्य केला. मी अनेक वर्षांपासून हॉलिवूडमध्ये काम करतोय. समंथा फॉक्स, बॉय जॉर्ज, एमसी हॅमर अशा अनेक हॉलिवूड कलाकारांना मी भारतातही आणले. काही वर्षांपूर्वी मी एका हॉलिवूड अल्बमसाठी गाणे गायले होते. पण प्रथमच मी एका अ‍ॅनिमेटेड हॉलिवूड फिल्मसाठी गातो आहे.
गेल्या अनेक दशकांच्या बॉलिवूडमधील या प्रवासाबद्दल काय सांगाल?
- मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे ते लता मंगेशकर अशा सगळ्या महान गायकांसोबत मी काम केले आहे. अमिताभ ते आमीर आणि जयाप्रदा ते विद्या बालन असे कलाकार माझ्या गाण्यांवर थिरकले आहेत. हा प्रवास अतिशय सुंदर होता आणि पुढेही सुंदरच असणार आहे. माझे आई आणि वडील दोघेही शास्त्रीय गायक आणि कंपोझर होते. त्यांच्याकडूनच मला संगीताचा वारसा मिळाला. तीन वर्षांचा असताना मी तबला वाजवायला शिकलो. तबला वाजत असतानाच मला मास्टर बप्पी ही ओळख मिळाली आणि ही ओळख मी प्राणपणाने जपली. बाकी माझा सगळा प्रवास तुम्ही जाणताच.
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात मोहम्मद रफीसाहेबांची टिंगल केली गेली, याबद्दल काय म्हणाल?
- होय, हे सगळं दुर्दैवी आहे. मोहम्मद रफीसाहेब, किशोरकुमार, मन्ना डे हे सगळे दिग्गज बॉलिवूड संगीताचे आधारस्तंभ आहेत. संगीताची कवडीचीही जाण नसणारे लोक रफी साहेबांबद्दल वाईट बोलत असतील, तर हे दुर्दैवी आहे. इतक्या महान कलाकारांबद्दल बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही.
सध्या कुठल्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहात?
- मी अगदी आत्ताच पार्था घोष व अन्य एका चित्रपटाची गाणी पूर्ण केली आहेत. आणखीही काही प्रोजेक्ट हातात आहेत. सध्या मी हॉलिवूडमध्ये व्यग्र आहे. या आगळ्या वेगळ्या इंटरनॅशनल प्रोजेक्टवर मी सध्या सर्व लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: 'The journey from Bollywood to Hollywood was beautiful'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.